बीड जिल्हा

शिरूरच्या शरद पवार कोरोणा केअर सेंटरला अँड. अजित देशमुख यांची भेट

शिरूरच्या शरद पवार कोरोणा केअर सेंटरला अँड. अजित देशमुख यांची भेट

शिरूर कासार ( प्रतिनिधी ) कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी शिरूर कासार येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत माननीय शरद पवार कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले असून या केंद्राची पाहणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली.

राष्ट्रवादीचे महबूब शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे केंद्र चालू केले आहे. या केंद्रात पन्नास रुग्ण ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पाहणीच्या वेळी डॉक्टर बडजाते, पत्रकार गोकुळ पवार यांच्यासह अन्य हजर होते. दोन मजली शाळेच्या परिसरामध्ये हे केंद्र चालू करण्यात आले आहे.

कोरोणाची लागण होणे, ही बाब आता सौम्य झाली असून आजाराची लक्षणे दिसल्यानंतर ताबडतोब तपासणी केली, तर हा आजार सर्दी खोकला या सारखा किरकोळ आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोक केअर सेंटर मध्ये नीट होत आहेत. याचा अर्थ त्यांना सलाईन, इंजेक्शन, ऑक्सिजनची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे लक्षणे दिसताच लोकांनी तपासून घ्यावे, असेही देशमुख यांनी यावेळी शिरूर तालुका वासियांना आवाहन केले.

या ठिकाणी डॉक्टर पारगावकर हे काम पाहणार असून त्यांची देखील भेट देशमुख यांनी घेतली. कोरोणा पेशंट वर चांगल्या दर्जाचे उपचार व्हावेत आणि त्यांची चांगली सेवा करावी, अशी अपेक्षा देशमुख यांनी डॉक्टरांसह केंद्र चालकांकडे व्यक्त केली.

——-
सोबतचा फोटो घ्यावा,
ही विनंती.
———-

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button