गेवराईबीड जिल्हा

राजमाता अर्बन मल्टीपल निधी चा द्वितीय वर्धापन दिन साजरा.

राजमाता अर्बन मल्टीपल निधी चा द्वितीय वर्धापन दिन साजरा.
—————————————-
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई येथील तागडगाव रोडवर असलेली राजमाता अर्बन मल्टी निधी चा आज (दि.२२) रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कोरोणासारख्या महामारी च्या
संकटामध्ये बीड जिल्ह्यासह राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या रोगाने थैमान घातले असून, सर्वच अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास दीड महिना झाले. लॉकडाऊन असल्यामुळे कसल्याही प्रकारचा उत्सव साजरा न करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस फुल पुष्पगुच्छ अर्पण करुन साधेपणा मध्ये साजरा करण्यात आला असून बँकेच्या ठेवीदार,खातेदार,तसेच इतर कुठल्याच मान्यवरांना बोलता आले नाही .
बँकेने दोन वर्षाच्या काळामध्ये जवळपास दीड कोटीच्या ठेवी झाल्या असून, गेवराई शहरासह तालुक्यातील सर्व जनतेने प्रतिसाद दिला असून बँकेच्या सर्व सभासद व ठेवीदारचे आभार
बँकेचे चेअरमन श्री. संतोष ठोसर यांनी व्यक्त केले.
राजमाता अर्बन बँकेचा व्दितीय वर्धापन दिन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस हार घालून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. संतोष ठोसर तर मुख्यअतिथी म्हणून श्री. निंबाळकर साहेब (ग्राम विकास अधिकारी सिंदखेड) होते, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रामकिसनजी ठोसर, विशेषउपस्थिती श्री. श्रीकिशन ठोसर श्री. व्हा. चेअरमन प्रदीप खरात, संचालक श्री. रमेशराव ठोसर, संचालक श्री. सर्जेराव ठोसर, श्री. स्वप्नील ठोसर श्री. संभाजी ठोसर यांच्या उपस्थितीत संस्थेचा व्दितीय वर्धापन दिनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी बँकेचे कर्मचारी श्री.दत्तराज गरुड(मॅनेजर), श्री. सुधाकर राकुसले (क्लर्क ) , श्री.संभाजी खरात (क्लर्क), सीमा रोटे (कॅशियर) यांनी सर्वांचे आभार मानले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button