बीडबीड जिल्हा

माध्यमांना चुकीची माहिती देऊन खोटे आरोप करू नयेत-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी

कोरोना काळात कोरोना रुग्णांची योग्य ती सुविधा देण्यासाठी बीड नगरपालिकेने आतापर्यंत स्वखर्चातून कामे केली आहेत कोवीड सेंटरमधील काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी ज्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे ती शासनाच्या नियमानुसार आणि मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे रीतसर निविदा प्रक्रिया करूनच केले जात असून यामध्ये कुठल्याही प्रकारचा मलिदा लाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बीड पालिकेकडे जर जर पुरेसे मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध असता तर निश्चितच पालिकेचे कोविड सेंटर सुरू केले असते मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही गेल्या चौदा महिन्यापासून पालिकेच्यावतीने जे शक्य आहे त्या सुविधा नागरिकांना देण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले आहे

बीड नगरपालिकेच्या वतीने 58 लक्ष रुपये किमतीच्या कोरोना प्रतिबंधक साहित्याची खरेदी रितसर शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार केली आहे मात्र माध्यमांना चुकीची माहिती देऊन विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले आहे वास्तविक पाहता बीड नगरपालिका अत्यल्प उत्पन्न असणारी नगरपालिका असून तरी सुद्धा कोरोना रुग्णांसाठी सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे सव्वा वर्षात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार जे शक्य होईल ती मदत केली जात आहे संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी अकरा लाखाचा निधी जमा केला असून बाहेर गावातून येणाऱ्या ऊसतोड मजुरांसाठी सैनिकी विद्यालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू केले आजही दोनशे बेडचे कोविड सेंटर या ठिकाणी चालू आहे,तसेच गेल्या वर्षीच 15 हजार कुटुंबांना अन्नधान्य व किराणा सामानाचे किटचे वाटप केले आहे, बीड नगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य कर्मचारी तसेच रुग्ण नगरपालिका कर्मचारी आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक किट चे वाटप करण्याचा निर्णय घेतला माननीय अण्णांच्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन कोटीची मागणी केली होती ती तात्काळ मंजूरही झाली त्यामुळेच आपण या सुविधा उपलब्ध करून देत आहोत बीड शहरात अद्ययावत अशा तीनच स्मशानभूमी उभारण्यात आले असून या ठिकाणी नगरपालिकेने नागरिकांना मोफत सुविधा दिल्या आहेत वर्षभरात कोविड सेंटरला लागणारा खर्च हा पालिका स्वखर्चातून करत असून रुग्णांसाठी बेड गाद्या उशा अशा सुविधा देऊन याठिकाणी स्वच्छतेची कामे केली जात आहे एवढेच नव्हे तर गेल्यावर्षी काकू नाना प्रतिष्ठान व होमिओपॅथिक कॉलेजच्या वतीने नागरिकांना औषधाचे वाटपही करण्यात आले तर वर्षभरात बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मास्क चे वाटप करण्यात आले आहे ज्या साहित्य बाबत शंका घेतली जात आहे त्याचे रीतसर टेंडर काढूनच खरेदी करण्यात आली आहे 58 लाखाचे साहित्य कुणी 18 लाखात देईल का? असा सवाल करून जर कुणी देणारा असेल तर वीस लाख रुपयाचा निधी देऊ त्यांनी 58 लाखाचे साहित्य नगरपालिकेला मिळवून द्यावे असे आवाहनही नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवण्याचा प्रस्ताव पालिकेने यापूर्वीच तयार करून शासनाला दिलेला आहे तो मंजूर देखील झाला असून हा निधी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे स्मशानभूमीतील कामाचा जिल्हा शल्य चिकित्सक यांचा कुठेही संबंध येत नाही,जी कामे पालिकेच्या अखत्यारीत आहेत ती जाणीवपूर्वक वळवली जातात, गेल्या 27 वर्षापासून बीडच्या नागरिकांना आपण कुठलाही अतिरिक्त कर वाढवला नाही वास्तविक पाहता दर चार वर्षांनी कर आकारणी बदलावी लागते मात्र बीडच्या नागरिकांना त्याचा भार पडू नये याची काळजी घेण्यात आली,पालिकेला पुरेसे उत्पन्न मिळाले तर नक्कीच आणखी सुविधा देण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता,जी विकासाची कामे होत आहेत त्यासाठी इतर योजनांमधून निधी आणावा लागला आहे,कोरोना काळात आरोग्य कर्मचारी,न प कर्मचारी जीवावर उदार होऊन सेवा देतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना किटचे वाटप करण्यात येत आहे,त्यामुळे माध्यमातून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नये,ज्या सूचना असतील त्या नक्कीच विचारात घेतल्या जातील, रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यावर एक वाफेची मशीन आणि व्हिट्यामिन सी च्या गोळ्यांचे देखील वाटप करू,असेही डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले आहे

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button