केजबीड जिल्हा

कुंबेफळ येथे नवीन कोविड केअर सेंटर चा शुभारंभ

कोविड केअर सेंटर कोरोना रुग्णांच्या सेवेकरीता सज्ज

केज/ प्रतिनिधी

केज तालुक्यातील तालुक्यातील कुंबेफळ येथे नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, केज ग्रामपंचायत कार्यालय कुंबेफळ आणि जिल्हा परिषद सदस्या डॉ योगिनीताई थोरात यांच्या पुढाकारातून उभारलेल्या कोविड केअर चा औपचारिकरित्या फित कापून दि.२१ रोजी शुभारंभ करण्यात आला असून आता हे कोविड केअर सेंटर कोरोना रुग्णांच्या सेवेकरीता सज्ज झाले आहे.

याप्रसंगी कोणताही गाजावाजा न करता जि. प सदस्या डॉ योगिनीताई थोरात , नवचेतना संस्थेच्या संचालिका मनीषाताई घुले, युसुफवडगाव पोलीस स्टेशन चे सपोनि श्री संदीप दहिफळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले , युसुफवडगाव प्रा.आ केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ ब्राह्मणे मॅडम तसेच कुंबेफळचे सरपंच श्री किशोर तात्या थोरात, ग्रामसेवक श्रीमती शेख मॅडम आणि ग्रा प सदस्य तसेच नवचेतना संस्थेचे कार्यकर्ते महादेव जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते श्री लालासाहेब शिंदे होळ यांच्या उपस्थिती मध्ये या कोविड केअर सेंटर चे लोकार्पण करण्यात आले

तसेच कोविड सेंटर साठी आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली असून येथे येणारा प्रत्येक रुग्ण हा योग्य उपचार घेऊन ठणठणीत होऊनच घरी जाईल अशा प्रकारे उपचार केले जातील असे डॉ योगिनीताई थोरात यांनी सांगतिले. तर या सेंटर मध्ये कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही याचे तंतोतंत नियोजन करण्यात येईल असे नवचेतना संस्थेच्या सर्वेसर्वा मनीषाताई घुले यांनी सांगितले आहे. तर ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छता, लाईट आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे सरपंच श्री किशोर तात्या थोरात यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे.

डॉ योगिनीताई थोरात या स्वतः सेंटर मध्ये भरती होणाऱ्या रुग्णांवर उपचार करणारा असल्याने ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी हे कोविड सेंटर वरदान ठरेल असा विश्वास याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी बोलून दाखवला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button