बीड जिल्हा

कोरोना काळात कुटूंबासोबतच सामाजाची सुद्धा काळजी घ्या : नरेंद्र पवार

● भाजप भटके विमुक्त आघाडीची ऑनलाईन बैठक

कोरोना काळात कुटूंबासोबतच सामाजाची सुद्धा काळजी घ्या : नरेंद्र पवार
● भाजप भटके विमुक्त आघाडीची ऑनलाईन बैठक

औरंगाबाद दि.20 (प्रतिनिधी) :- कोरोना महामारीत प्रत्येकाने आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. मात्र समाजातील उपेक्षित घटकासाठी आपल्याला काही करता येईल का? याचेही सामाजिक भान व जाण कार्यकर्त्यांनी ठेवायला हवे असे प्रतिपादन भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्रदादा पवार यांनी केले.
राज्यातील कडक लोकडाऊन व कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी भाजप भटके विमुक्त आघाडीच्या मराठवाडा विभागाची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. त्यात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पवार मार्गदर्शन करत होते. यावेळी प्रदेश सह संयोजक मा.अशोकभाऊ चोरमले, प्रदेश महिला संयोजिका डॉ. उज्वलाताई हाके, युवा महिला संयोजिका भाग्यश्री ढाकणे, अमोल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीचे आयोजन संघटनेचे मराठवाडा संयोजक बंडू खांडेकर व महिला आघाडीच्या संयोजिका डॉ.उज्वला दहिफळे यांनी केले होते. विभागातील सर्व जिल्हा संयोजकांनी आपापली मते मांडली. संचलन अशोकराव चोरमले यांनी तर प्रास्ताविक बंडू खांडेकर यांनी केले. मार्गदर्शन पर भाषणात नरेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून गोरगरिबांचे हाल होत असल्याचे म्हटले. तसेच कार्यकर्त्यांनी गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन केले.
सदरील ऑनलाईन बैठकीत मराठवाडा विभागातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यालयीन मंत्री राज खैरनार, वासुदेव समाज प्रमुख संतोष हादवे, जिल्हा संयोजक डॉ. लक्ष्मणजी जाधव, श्रीरंगजी राठोड, सीताराम वणवे, नामदेवराव चव्हाण, नरेंद्रसिंग बायस, प्रल्हादजी जाधव, सोशलमीडिया प्रदेश संयोजक कोंडाजी कडणर, भूषण पवार, संजय कारभारी, यशवंत मेढे,बालाजी गीते, गणेश मुंडे, प्रमोद परदेशी, संभाजी शेळके, विजय बोटूळे, पवन माने, प्रदीप सरवदे, अनिल भांडे, अशोक शेळके, बालाजी सिंघनाथ, विजय वाघ, आकाश शिंदे, रमेश पेंढारकर, कृष्णा कोंडेकर, चंदू धुर्वे, विनोद फडे, बालाजी गीते, संतोष जाधव, जितेश राठोड, मिलिंद सिंग, विशाल मस्के, अजित गायके, शंकर साबळे, महादेव कुंडकर, राहुल धोतरे, धोंडीराम ढोरमारे, जनार्धन कारभारी, अर्जुन राठोड आदींची उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button