ब्रेकिंग न्यूज

जिल्हा प्रशासनाने खताच्या काळ्याबाजारा कडे लक्ष द्यावे

अनेकांचे गोदाम भरलेले - अँड. अजित देशमुख

बीड ) शेतकरी आता मशागत आणि काही दिवसानंतर पेरणीला लागणार आहे. खत खरेदी या नंतर चालू होईल. मात्र दुसरीकडे खत विक्रेते जुना साठा तसाच दाबून ठेवून नव्या भावा विकण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा प्रशासनाने आजच कोणत्या खत विक्रेत्याकडे किती खत शिल्लक आहे, याची माहिती घ्यावी आणि प्रशासनाच्या माणसा देखत खत विक्री करण्यास भाग पाडावे. आज जुन्या किमतीची अनेक गोदाम भरलेली आहेत. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

खत विक्री मध्ये दरवर्षी काळाबाजार होतो. यावर्षी कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनी याकडे आतापासूनच लक्ष द्यावे. खत विक्रेते सांगून ऐकत नाहीत. त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचवणे योग्य नाही. प्रत्यक्षात प्रत्येकाकडे किती खत शिल्लक आहे, या उपलब्ध साठ्याचा बोर्ड प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानात कायमस्वरूपी दररोज लावावा. आज रोजी किती खत शिल्लक आहे, हे ग्राहकाला प्रत्येक दुकानात दिसले पाहिजे. यामुळे दुकानदाराचा काळाबाजार थांबेल.

गेल्या वर्षीच्या भावामध्ये ज्या दुकानदारांनी खत घेऊन ठेवलेले आहे आणि त्यांचा साठा गोदामामध्ये उपलब्ध आहे, या सर्व साठ्याचे पंचनामे करून अगोदर जुन्या भावात हे खत विक्री झाली पाहिजे आणि त्यानंतरच नव्या भावाने आलेले खत विक्री झाली पाहिजे, याची प्रशासनाने दक्षता घ्यायला हवी

कोरोणाच्या परिस्थितीमध्ये शेतकरी हतबल झाला आहे. भाजीपाला सारखी पिके विकता आले नाहीत. म्हणून शेतकरी त्रस्त आहे. त्यातच चढ्या भावाने खत विक्री झाली अथवा खताचा काळा बाजार झाला तर शेतकऱ्याला आणखी त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच लक्ष द्यावे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आपापल्या अखत्यारीतील सर्वांना याबाबत सक्त ताकीद देऊन उपलब्ध उपलब्ध माल जुन्या आणि नव्या दराचा किती आहे, याच्या दुकानदार निहाय यादी जाहीर कराव्यात, असे ही अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button