बीड जिल्हा

आ.संदीपभैय्या क्षीरसागरांचा निराधारास आधार

संजय गांधी,श्रावणबाळ,वृद्धपकाळ लाभार्थ्यांच्या दोन महिन्याचे सहा कोटी दोन लक्ष अनुदान खात्यावर जमा

आ.संदीपभैय्या क्षीरसागरांचा निराधारास आधार
*संजय गांधी,श्रावणबाळ,वृद्धपकाळ लाभार्थ्यांच्या दोन महिन्याचे सहा कोटी दोन लक्ष अनुदान खात्यावर जमा.*
— भाऊसाहेब डावकर,अशफाक इनामदार
— पालकमंत्री धनंजय मुंडेसाहेब यांच्या आदेशाने व कर्तव्यदक्ष आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने संजय गांधी योजनेचे एक कोटी पासष्ट लक्ष,श्रावणबाळ निवृत्ती योजनेचे तिन कोटी दहा लक्ष,वृद्धपकाळ निवृत्ती योजनेचे एक कोटी पंचेचाळीस लक्ष असा एकुण सहा कोटी दोन लक्ष रुपयाचा निधी लाभार्थींयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर,अश्फाक इनामदार यांनी दिली आहे.
गेल्या दोन वर्षापासून संजय गांधी, श्रावणबाळ,वृद्धपकाळ या योजनेअंतर्गतचे पैसे खुप वेळा प्रलंबित असायचे परंतु आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या सततच्या प्रयत्नाने गेल्या काही महिन्यापासून सतत पाठपुरावा केल्यामुळं लाभार्थ्यांना अनुदान मिळत आहे.लाभार्थ्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेसाहेब व आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांच्यामुळेच अनुदान रक्कम वेळेवर मिळत असल्याने समाधान व्यक्त करत आहेत.संजय गांधी योजनेपासून गेल्यादोन वर्षा पासुन निराधार,वंचित उपेक्षित आहेत.त्यांचीही बैठक लवकरच लावु असे मा.तहसिलदार यांनी तोंडी अश्वासीत केले आहे.अशी माहिती संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर,अश्फाक इनामदार यांनी दिली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button