बीड जिल्हा

धड फेकताही येईना.. अन् विकताही येईना…

माल पिकवला पण आता विकायचा कोठे, सततच्या लॉकडाऊन मूळे शेतकरी झाला हवालदील.

  • कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने अनेक कठोर निर्णय
    लागू केले  आहे. यामुळे सर्वसामान्यांसह अनेक व्यापार्‍यांचे मोठे
    हाल होत आहेत.

बीड (प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या खेड्यापाड्यातील, बळीराजा समोर अनेक संकटाचा सामना करत वर्षभर माल पिकवला आता तो विकायचा कसा?
कारण शासनाने आठवडी बाजार बंद केले व भाजी मंडीई सुध्दा बंद केली यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाचे नियम, शेतकर्‍यासाठी आर्थिक अडचण निर्माण करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोणाचे संकट सुरूच आहे.
मध्यंतरीच्या कालावधीत कोरोना चा संसर्ग कमी झाला होता. मात्र, आता गत दीड महिन्यापासून पुन्हा संसर्ग वाढला आहे. कोरोनाने ग्रामीण भागाला विळखा घातला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहे.
यामुळे सर्वच व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागातील, छोटे-मोठे व्यवसायिक, शेतकरी, भाजीपाला उत्पादक हे आठवडे बाजारात भाजीपाल्याची तसेच अन्य साहित्याची खरेदी विक्री करत असतात. मात्र, आठवडी बाजार बंद पडल्याने हे व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्रातील कामगार शहरात येऊन अथवा बांधकामावर मजुरी करतात. त्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदर निर्वाह असतो. मात्र, आता हाताला काम नसल्याने मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह मजूरवर्गही संकटात सापडले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button