बीड जिल्हा

शारदा कोविड सेंटर मधून दोन हजार सहाशे कोरोणा रुग्ण बरे होऊन गेले घरी

ऑक्सिजन बेड मुळेही वाचले गरिबांचे पैसे - अँड. अजित देशमुख

शारदा कोविड सेंटर मधून दोन हजार सहाशे कोरोणा रुग्ण बरे होऊन गेले घरी

– ऑक्सिजन बेड मुळेही वाचले गरिबांचे पैसे

– अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी )कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक संस्था शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढे आल्या. गेवराई तालुक्यातील गढी येथे शारदा कोविड सेंटर चालू करण्यात आले. या ठिकाणी दोनशे बेड सुरवातीला तयार करण्यात आले आणि यानंतर वीस ऑक्सिजनचे बेड देखील तयार करण्यात आले. बारकाईने पाहणी केल्यानंतर येथील तब्बल दोन हजार सहाशे रुग्ण बरे होऊन घरी गेले, हे दिसून आले. त्यामुळे या सेंटरचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून आल्याचे ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

शारदा कोविड सेंटर, शिवाजीनगर, गडी ठिकाण अँड. अजित देशमुख यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधून संपूर्ण केंद्राची पाहणी केली. ऑक्सीजन बेड वर असलेल्या रुग्णां बरोबरही संवाद साधला.

या सेंटरवर जे रुग्ण म्हणून दाखल झाले, त्यांचेवर आरोग्य विभागाचे टीमने देखील बारकाईने लक्ष ठेवून उपचार केले. दिनांक २५ मे २०२१ पर्यंत या केंद्रावर दाखल झालेल्या रुग्णांपैकी दोन हजार पाचशे अकौऐंशी रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर केवळ एकोन पन्नास रुग्ण पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. यातही अर्ध्यावर रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर काही रुग्ण उपचाराधीन आहेत. रेफर केलेले जवळपास अर्धे रुग्ण बरे होऊन घरी आले असल्याची माहिती या केंद्रावर असलेल्या सूत्रांकडून कळाली आहे.

या ठिकाणी काल मंगळवारी एकशे अकोन्ननवद रुग्ण काल उपचार घेत होते. ऑक्सीजन बेड मुळे येथून अन्यत्र उपचारासाठी रुग्णांना पाठवावे लागले नाही. त्यामुळे परिसरातील अथवा या केंद्रामध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी ज्यांना ऑक्सिजनची गरज होती, अशा रुग्णांचे लाखो रुपये या मोफत सेंटरमुळे वाचले आहेत. त्यामुळे या संस्थेने केलेले काम चांगल्या पद्धतीने केले आणि येथील आरोग्य विभागाच्या टीमने देखील चांगल्या पद्धतीने सेवा देऊन रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना समाधान दिले, हे दिसून आले.

कोरोणा महामारीच्या या संकटामध्ये एकीकडे सामान्य जनतेचे हात बंद असताना दुसरीकडे जिल्ह्यातील वेगवेगळ्या कारणांमुळे उद्भवलेल्या दुष्काळा सारख्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या लोकांना देखील सेंटरने निश्चितच धैर्य दिले आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाने देखील सेवा देण्याची चांगली पायाभरणी केली असून आरोग्य विभाग देखील सेवेत कमी पडत नसल्याचे सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोविड सेंटरमधून रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याने देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे. या पाहणीच्या वेळी डॉक्टरांसह तेथील सर्व स्टाफ आणि या केंद्रावर निगराणी साठी असलेले सर्व मान्यवर उपस्थित होते. ते देखील आपल्या सेवेत तत्पर आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button