बीडबीड जिल्हा

एक हाक मुक्या जीवांची तहान भागविन्यासाठी…

जसे जमेल तिथे मुक्या पशु-पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी व्यवस्था करावी-राष्ट्रप्रथमच्या सदस्याचे आवाहन.

कोविड च्या भीषण परिस्थितीत मनुष्यच स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत असताना मुक्या जीवांकडे कोण लक्ष देणार,त्यांचे होणारे हाल याची कल्पनाच न केलेली बरी.रस्त्याने खूप मुके जनावरे फिरत असताना पाणी पिण्यासाठी ही त्यांची होणारी तडफड थांबवण्यासाठी राष्ट्र सर्वप्रथमच्या टीम ने व्यवस्था केली.बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर हे पाणवठे ठेऊन या मुक्या जीवांची तृष्णा भागवण्यासाठी प्रयत्न केले.सर्वांना विनंती आहे आपल्यालाही जसे जमेल तिथे मुक्या पशु-पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी आपल्या घराच्या टेरिस वर,खिडकी जवळ,किंवा घराशेजारी व्यवस्था करावी,जेणेकरून त्यांची किमान पाणी पिण्यासाठी होणारे हाल थांबतील.असे आवाहन राष्ट्र प्रथम आमच्या टीमने केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button