ब्रेकिंग न्यूज

स्मशानभूमी-कब्रस्तान बचाव जन आंदोलन कडून जमाअत ए महेदविया दायरा कब्रस्तान ची पाहणी

बीड (प्रतिनिधी) – स्मशानभूमी-कब्रस्तान बचाव जन आंदोलन च्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या जमाअत ए महेदविया दायरा कब्रस्तान ची पाहणी करून कब्रस्तान ची झालेली दुरावस्था दूर करण्याकरिता शासन-प्रशासनाकडे सातत्याने युद्धपातळीवर पाठपुरावा करून कब्रस्तान ची दुरावस्था दुर करू असे आश्वासन दिले.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, जमाअत ए महेदविया दायरा कब्रस्तान ची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय व शोचनीय झालेली आहे. तसेच कब्रस्तान च्या मोकळ्या सहन जागेत काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. संरक्षक भिंतींची मोठ्या प्रमाणात तुट-फूट झालेली आहे. तसेच कब्रस्तान साठी पाण्याचे एकमेव स्त्रोत असलेली विहीर ढगे कॉलनी-मोमीनपुरा बायपास रस्त्याच्या निर्माणावेळी बीड नगर परिषदेकडून हलगर्जीपणाने दगड, गोटे, माती, मुरूम टाकून बुजविण्यात आली आहे. ही विहीर कब्रस्तानकरिता पुनरुज्जीवित करण्याची नितांत आवश्यकता आहे. हे सर्व प्रश्न स्मशानभूमी-कब्रस्तान बचाव जनआंदोलनाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष बप्पा सोनवणे, मार्गदर्शक राजाराम भाऊ जाधव, बीड जिल्हाध्यक्ष अनिलकुमार चांदणे या पदाधिकाऱ्यांनी महेदविया कब्रस्तान ला भेट देऊन पाहणी केली असता कब्रस्तान कमेटीचे कार्याध्यक्ष तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, उपकार्याध्यक्ष शेख अख़ील मुहम्मद यांनी सविस्तरपणे त्यांच्या समोर मांडले. यावेळी एआयएमआयएम पक्षाचे युवा नेते सय्यद इलयास यांची प्रमुख उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button