केजबीड जिल्हा

पिंपळगाव येथील अमोल अंधारे बनले गोरगरीबांचे अन्नदाते

केज/ गेल्या वर्षी पासून कोरोना महामारीने सर्वच शहरी व ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली असुन

घरात राहुन खायचे काय आणि जगायचे कसे असा मोठा प्रश्न गोरगरिबांना पडल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे आता कठीण झाले आहे .
मोलमजुरी करून खाणाऱ्या गरीब लोकांना याचा मोठा फटका बसला आहे,काम केले तर कुटुंब चालत असते, नाहीतर उपाशी मारण्यापालिकडे काही नाही. असे म्हणायला काही हरकत नाही .
कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत असल्यामुळे मोलमजुरी करून आपली उपजीविका भागविनारांचे हातचे काम बंद झाल्यामुळे , बऱ्याच कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे,या सर्व गोष्टींचे भान ठेवून केज येथील शिवसेना तालुका अध्यक्ष रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगावचे जेष्ठ नागरिक बजरंग (बाप्पा) देशमुख व समाजसेवक अमोल अंधारे यांनी दि.२६/५/२०२१ रोजी आपल्या गावातील दलित वस्तीवर जाऊन लोकांची परिस्थिती जाणून घेत त्यांना गहू ५ किलो ,ज्वारी ५ किलो , किराणा व इतर जिवनावश्क वस्तूंचे वाटप केले.यावेळी शिवजी दुनघव,गयाबाई वाघमारे,मंचिक जगताप,भीमराव वाघमारे,संगीता वाघमारे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button