ब्रेकिंग न्यूज

अमृत अटल पाणी पुरवठा योजनेचे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा – नगराध्यक्ष

अमृत अटल पाणी पुरवठा योजनेचे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा - नगराध्यक्ष

बीड:- बीड नगर परिषद येथे शहरात सुरू असलेल्या अमृत अटल पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
याबैठकीत मुख्य पाईपलाईनचे काम पूर्ण होत आले असून १०० मीटर वगळता बाकी सर्व काम पूर्ण झाल्याचे सांगत कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी २५ एम.एल. डी. क्षमतेच्या शुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

बीड शहरात आतापर्यंत दोनशे दहा किलोमीटर लांबीचे वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झालेले असून १९ झोन पैकी ०६ झोन तातडीने कार्यान्वित करण्याच्या तसेच उर्वरित कामे ३० जून पूर्वी पूर्ण करून बीड शहरास अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी यावेळी दिल्या.

यावेळी शहरातील उपस्थित नगरसेवकांनी औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता लोलापोड यांच्यासमोर आप -आपल्या प्रभागातील समस्या मांडून रखडलेल्या कामाचा पाडाच वाचला. व ही रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर कंपनीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
नगरसेवकांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेऊन मुख्य अभियंता यांनी तातडीने चौकशी व स्थळ पाहणी करून त्या सोडविण्यासंदर्भात सूचना केल्या.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बीड शहरात आत्तापर्यंत २१० किलोमीटर लांबीचे वितरण व्यवस्थेचे काम झाल्याचे सांगितले.तसेच शहरातील सारडा शैक्षणिक संकुल समोरील पाण्याच्या टाकीचे काम वगळता इतर सर्व जलकुंभाची कामे झाल्याचे सांगितले.

भुयारी गटार योजनेचे संथ गतीने होणाऱ्या कामाबाबत नगराध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.यावर भुयारी गटार योजनेचे आतापर्यंत झालेल्या ५० किलोमीटर कामामध्ये झालेल्या रस्त्याचे सुधारण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येईल असे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. या बैठकीत दोन्ही कंत्राट दारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी सूचना नगराध्यक्षांनी दिल्यानंतर मुख्य अभियंता यांनी अधीक्षक अभियंता यांना कारवाईचे आदेश दिले.
या बैठकीत औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता लोलापुरे,अधीक्षक अभियंता सिंग साहेब, न.प. मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, यांच्यासह बांधकाम सभापती विनोद मुळूक, नगरसेवक मुखिद लाला, रवींद्र कदम, शुभम धूत, अश्फाक भाई, अजहर भाई, उप अभियंता जोगदंड, सहाय्यक अभियंता वाघ , न.प.अभियंता राहुल टाळके व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button