बीड जिल्हा

जेलमध्ये घाला म्हणताच उघडले आरटीओ ऑफिस – अँड. अजित देशमुख

जेलमध्ये घाला म्हणताच उघडले आरटीओ ऑफिस

– अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) गेल्या दोन महिन्यापासून बीडचे आरटीओ ऑफिस पूर्णतः बंद होते. आरटीओ सह तिथली यंत्रणा कोणीही हजर नव्हती. काल जनआंदोलनाने या मुद्द्याचे स्टिंग ऑपरेशन केले. आणि आरटीओ सह सर्व लोकांना जेलमध्ये घालून त्यांचे वेतन कपात करण्याची मागणी केली. आणि आज आरटीओ ऑफिस चालू झाले. निगरगट्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी अँड. अजित देशमुख यांनी केली आहे.

राज्यात कुठेही नसेल अशा प्रकारचे प्रत्येक मुद्दे बीड जिल्ह्यात घडतात. आम्हीही त्याला पुरून उरतो. दोन-दोन महिने आरटीओ ऑफिस बंद पडत असेल आणि बंद ठेवले जात असेल तर जिल्हा प्रशासन नेमकं काय करते ? हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो.

दोन महिन्यापासून जनतेची कामे खोळंबली आहेत. ही कामे लवकर मार्गी लावण्यासाठी आता या अधिकाऱ्यांनी प्रामाणिक पणाने सेवा बजावावी. अन्यथा आम्हाला पुन्हा लक्ष द्यावे लागेल, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button