बीड जिल्हामाजलगाव

दिंद्रुडचे  हरहुन्नरी व्यक्तीमत्व सदाशिव शेटे यांचे निधन

◆ ओमप्रकाश शेटे यांना पितृशोक

दिंद्रुडचे  हरहुन्नरी व्यक्तीमत्व सदाशिव शेटे यांचे निधन
◆ ओमप्रकाश शेटे यांना पितृशोक
दिंद्रुड दि.27 (प्रतिनिधी) :- दिंद्रुड येथील प्रसिद्ध व्यापारी सदाशिव बेलाप्पा शेटे वय 80 वर्षे यांचे आज सकाळी 7 वा हिपॅटिक कोमा, हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर दिंद्रुड ता.माजलगाव जि. बीड येथील शेटे फार्महाऊस परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
              माजलगाव तालुक्यातील दिंद्रुडचे भूमिपुत्र व  महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देणारे देवदूत ओमप्रकाश शेटे, आयुष मंत्रालय भारत सरकारचे तज्ञ संचालक तथा शिवव्याख्याते डाॅ शिवरत्न शेटे, अॅड किर्तीकुमार शेटे या कर्तृत्ववान मुलांचे जन्मदाते सदाशिवआण्णा शेटे मागील काही दिवसांपासून लिव्हरच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर लातूर येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली मात्र त्यास यश आले नाही.  सकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
            कुठल्याही क्षेत्रात मनापासून आवड असणारे शेटे आण्णा हे हुरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. बालपणीच त्यांचे वडिलांचे छत्र हरवले होते. मात्र परिस्थितीशी संघर्ष करत व्यापारात त्यांनी नावलौकिक मिळवला. किराणा, ट्रेडर्स, बीज भांडार, सराफा व्यवसायात त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. प्रचंड हजरजवाबीपणा हा त्यांचा स्थायी भाव.
         व्यावसायिक क्षेत्रासोबतच कलेची आवड असलेल्या शेटे यांनी वयाच्या ६० व्या वर्षांत त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांत भुमीका निभावल्या. वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांच्यातील उत्साह हा तरुणांना लाजवेल असा होता. त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
  ना.फडणवीस व मुंडे यांच्याकडून सांत्वन
ओमप्रकाश शेटे यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे समजताच राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, काडसिद्धेश्वर स्वामी कोल्हापूर, भाजपचे जेष्ठ नेते श्रीकांत भारतीय, आ.अभिमन्यू पवार , मा.आ.मोहनराव फड, भगीरथ बियाणी आदींनी फोनवरून शेटे परिवाराचे सांत्वन केले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button