बीड जिल्हा

जिल्ह्यातील सर्व बँका 31 तारखेपासून पूर्ण वेळ राहणार चालू

जिल्हाधिकार्याचे नवीन आदेश

उपरोक्त विषयी संदर्भ क्र .1 च्या आदेशान्वये कोव्हीड -19 चे वाढते रुग्ण संख्या लक्षात घेता दि .25.05.2021 रोजीचे रात्रीचे 12.00 वाजेपासून ते 31.05.2021 रोजीचे रात्रीचे 12.00 वाजेपर्यंत निबंध लागू केले आहेत . संदर्भ क्र .3 अन्वये आपण खरीप हंगामात पीक कर्जाच्या वितरणास गती मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकर्सना त्यांच्या नियमीत ठरलेल्या वेळेत काम करण्याचे आदेश होणेस विनंती केली आहे . त्याअनुषंगाने कळविण्यात येते की , संदर्भ क्र .3 च्या विनंती च्या अनुषंगाने खरीप हंगामात पीक कर्जाच्या वितरणास गती मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांचे कामकाज दि .31.05.2021 पासून शासनाच्या नियमीत वेळेप्रमाणे पूर्णवेळ सूरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे . सदरील परवानगी बाबत आपण आपल्या स्तवरावरुन जिल्ह्यातील सर्व बँकाना अवगत करावे . सदरील परवानगी कोव्हीड -19 चे सर्व नियम पाळण्याच्या अटीस अधिन राहून देण्यात येत आहेत ,

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button