गेवराईबीड जिल्हा

स्फूर्ती कला अकादमी, गेवराई च्या वतीने बीड जिल्हा स्तरीय ऑनलाइन कथाकथन स्पर्धेचे आयोजन

गेवराई  )गेवराई येथील स्फूर्ती कला अकादमीच्या वतीने नुकत्याच निधन पावलेल्या स्वर्गीय प्राध्यापक दिनेश माने स्मृतिप्रीत्यर्थ बीड जिल्हा स्तरीय भव्य मराठी कथाकथन स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . स्फूर्ती कला अकादमीचे कार्य गेवराई मध्ये 1980 पासून सुरू असून त्या वेळेची बाल कलावंत असलेले डॉ. सुधीर निकम, प्रशांत रुईकर, भरत कोरडे, संजय करमाळकर, गणेश पाटील, विलास देशमुख ,मुकुंद टाक ,समीर जाधव आदींनी एकत्र येऊन स्वर्गीय प्राध्यापक दिनेश माने सर यांना ऑनलाइन श्रद्धांजली अर्पित करून त्यांचे कथाकथन विषयातील कार्य पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. केले आहे या स्पर्धेकरिता आकर्षक रकमेचे पारितोषिक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप ठेवण्यात आले आहे. हि स्पर्धा 16 ते 50 वर्ष वयोगटासाठी असुन, बीड जील्हयातील आजी माजी रहिवासीयांना खुली आहे.या स्पर्धेकरता नोंदणीचा अंतिम दिनांक 4 जून 2021 ही असून या तारखे नंतर पुढील आठ दिवसात स्पर्धकाने आपली कथा पीडीएफ स्वरूपात व सादरीकरण व्हिडिओ चित्रफीत स्वरूपात पुढील संपर्कावर पाठवावे असे आवाहन स्फूर्ती कला अकादमीचे प्रकाश भुते व ज्ञानेश्वर मोटे यांनी केले आहे. संपर्कासाठी व्हाट्सअप नोंदणी क्रमांक 96656021 01, व 9850343319तर पीडीएफ स्वरुपात कथा व व्हिडीओ पाठवण्यासाठीruikar24@gmail.com व dnanesh777@gmail.com या मेलवर संपर्क करावा .तसेच यानोंदणीनंतर सर्व स्पर्धकांची आँनलाईन वरिल विषयावर कार्यशाळा देखील मान्यवरांच्या मार्गदर्शना खालीघेतली जाणार आहे.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे अकादमीच्या वतिने कळवण्यात आले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button