बीड जिल्हा

जिल्ह्यात आज पासून १५ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवला, जिल्हाधिकार्याचे नवीन आदेश

ज्याअर्थी , मा.मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन , मंत्रालय , मुंबई यांचेकडील दि .३०.०५.२०२१ रोजीच्या संदर्भ क्र .१८ च्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील भरलेले ऑक्सिजन बेड्स ची संख्या ४० % पेक्षा जास्त असल्याने सदर आदेशामधील परिच्छेद इ ( E ) मधील तरतुदी बीड जिल्ह्याला लागु होतात , त्याअर्थी , मी रविंद्र जगताप , जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , मला प्राप्त अधिकारानुसार तसेच फौजदारी प्रक्रीया संहीता १ ९ ७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून कॉविड १ ९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता दिनांक ०१.०६.२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून ते १५.०६.२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे . १. दिनांक ०१.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपासून ते १५.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० या दरम्यान केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील . सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्र , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स : फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसीचे उत्पादन व वितरण , सैनिटायझर्स , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा , पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने , टपाल सेवा इ . उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चाल राहणार नाहीत . २. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील . ३. दि .०१.०६.२०२१ ते १५.०६.२०२१ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना ( किराणा दुकाने , भाजीपाला , फळविक्री , चिकन , मटन विक्रीचे दुकाने , बेकरी संबंधित इ . ) केवळ सकाळी ०७.०० ते सकाळी ११.०० या वेळेत चालू राहतील व शनिवार , रविवार पूर्णपणे बंद राहतील . ४. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील , ५. जिल्ह्यातील सर्व बँक / ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज दि .३१,०५.२०२१ पासून शासनाच्या नियमीत वेळेप्रमाणे पूर्णवेळ सूरु राहतील . ६. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे २५ % उपस्थितीत सुरु राहतील . ( ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल . ) ७. लसीकरणा करीता ४५ वर्षावरील ज्या व्यक्तींना मेसेज आला आहे . आरोग्य विभागाचे पत्र आले आहे . त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल . ( लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पत्र , आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल . ) ८. कृषी व्यवसायाशी संबंधित बि – बियाणे , खते , औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बि – बियाणे , खते , औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल . तसेच कृषि विक्रेत्यांना / शेतकन्यांना बि बियाणे , खते , औषधे विक्रीस खरेदीस पूर्णवेळ सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत परवानगी असेल , ( शनिवार व रविवार सुध्दा विहीत वेळेत चालु राहतील . ) ९ . कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० या वेळेतच सुरु राहतील . १०. नरेगाची कामे सुरु राहतील , त्या ठिकाणी सामाजिक अंतर , मास्क , सैनिटायझर चा व कोविड -१ ९ विषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल , ११. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांना सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील . ( राशनसाठी जाणा – या व्यक्तींच्या सोबत राशनकार्ड , आधार कार्ड असणे आवश्यक आहे . ) १२. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील . १३. दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतूकीवर निर्बंध असणार नाहीत , परंतु दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही . या नियमाचा भंग केल्यास सदर दुकान कोरोना साथ अधिसूचना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल व दिनांक १२.०५.२०२१ च्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे दंड आकारण्यात येईल . सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील . उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल . सदर आदेशाचा अंमल दिनांक ३१/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० पासुन राहील . सदरचे आदेश दिनांक ३१/०५/२०२१ रोजी माझ्या सही शिक्यानिशी दिले .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button