गेवराईबीड जिल्हा

अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त कोवीड सेंटरमध्ये जेवण, बिसलेरी बॉक्स,बिस्कीट, फळे वाटप

सह्याद्री हॉस्पिटलला १५००० रुपयाचा धनादेश सुपुर्द

गेवराई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषीकेश बेदरे यांच्या वतीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय, कस्तुरबा गांधी कोविड सेंटर, अट्टल महविद्यालयातील महिला कोविड सेंटर, गढी येथील शारदा कोविड सेंटर येथे १०० बिसलेरी बॉक्स,१ हजार बिस्कीट पुडे, तसेच फळे वाटप करण्यात आले तर औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख वसीम शेख महमूद यांनी सह्याद्री हॉस्पिटल, औरंगाबाद मधील गरिब रुग्णांना मदत म्हणून रुपये १५००० चा धनादेश डॉक्टरांकडे सुपूर्द करण्यात आला. गुंतेगाव येथील मदनबापू गोर्डे व मालेगावचे माजी उपसरपंच श्रीराम गंगाधर यांच्या कडून शारदा कोवीड केअर सेंटर येथील रुग्णांना जेवण वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत समाजोपयोगी उपक्रम राबवून गोरगरीबांना धीर देण्याचे मोठे काम केले आहे. बीड जिल्ह्यात पहिल्यांदा त्यांनी २०० खाटांचे कोविड केअर सेंटर तसेच ७० खाटांचे महिलांसाठी कोविड केअर सेंटर उभारले.तसेच त्यांना अभिप्रेत असे कार्य कार्यकर्ते देखील करत असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषीकेश बेदरे यांच्या वतीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय, कस्तुरबा गांधी कोविड सेंटर, अट्टल महविद्यालयातील महिला कोविड सेंटर, गढी येथील शारदा कोविड सेंटर येथे १०० बिसलेरी बॉक्स,१ हजार बिस्कीट पुडे, तसेच फळे वाटप करण्यात आले.

यावेळी तालुका वैद्यकिय अधिक्षक महादेव चिंचोळे, डॉ. राजेश शिंदे, कोरोना रुग्णसेवा समितीचे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, नगर सेवक राधेश्याम येवले,दादासाहेब घोडके, शेख खाजाभाई, महम्मद गौस, बाळासाहेब सानप, प्रशांत गोलेछा, संपादक अमोल वैद्य, संदीप मडके,अक्षय पवार,अर्जुन सुतार,कर्णवीर गाडे,वसीम फारोकी,भाऊ बेदरे ,सुधिर कांबळे, रमेश पागिरे , बाळासाहेब फरताडे, राधेश्याम काकडे, फारोकी, रामा घोलप ,बंडु वाघमारे ,फेरोज शेख,
रवि भुंजगे, रावसाहेब महाजन यांची उपस्थिती होती.

गुंतेगाव येथील मदनबापू गोर्डे व मालेगावचे माजी उपसरपंच श्रीराम गंगाधर यांच्या कडून शारदा कोवीड केअर सेंटर येथील रुग्णांना जेवण देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती जगन काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, सुभाषराव मस्के, काकासाहेब जाधव, सचिन काळे आदी उपस्थित होते.

सह्याद्री हॉस्पिटलला १५००० रुपयाचा धनादेश सुपुर्द
अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख वसीम शेख महमूद यांनी सह्याद्री हॉस्पिटल, औरंगाबाद मधील गरिब रुग्णांना मदत म्हणून रुपये १५००० चा धनादेश डॉक्टरांकडे सुपूर्द करण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button