बीड जिल्हामाजलगाव

माजी मंत्री पंकजाताई व खा.प्रीतमताई मुंडे यांच्याकडून शेटे परिवाराचे सांत्वन

● अनेक मान्यवरांच्या फोनवरुन सहवेदना..!

दिंद्रुड  :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे वडील सदाशिवआण्णा शेटे यांचे नुकतेच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी दिंद्रुड येथे शेटे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. स्व.आप्पांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सदाशिवअण्णा शेटे यांचे निधन झाल्याने अतीव दुःख झाले. एक कुटुंबवत्सल, सर्वांशी आपुलकीने वागणारे आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अण्णांची ख्याती आहे. त्यांच्या निधनामुळे शेटे कुटुंबीयावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. आपल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे अशा शोकभवना पंकजाताई व प्रीतमताई मुंडे यांनी व्यक्त केले. त्यांनी डॉ.शिवरत्न, ऍड.किर्तीकुमार व ओमप्रकाश शेटे यांचे सांत्वन केले.
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, विधानपरिषद सदस्य आ.सुरेशराव धस, समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, रमेशराव कराड,शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, अमरनाथ खुरपे, मा.नगराध्यक्ष सहाल चाऊस, जेष्ठ नेत्या सुशिलाताई मोराळे, ऍड.मिलिंद आव्हाड,अशोक जैन, सोमनाथआप्पा हालगे, बबनराव सरवदे, माधवराव निर्मळ, दादासाहेब मुंडे, सातींदर मैंद, विनायक मुळे, भाऊसाहेब प्रभाळे आदींनी दिंद्रुड येथे शेटे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.
शालेय शिक्षण व जलसंपदा मंत्री ना.बच्चूभाऊ कडू, समरजीतसिंह राजे घाटगे, आमदार राहुल कुल, आ.बाळा नांदगावकर, सिनेअभिनेता सुहास सिरसाट, मुंबई सकाळचे संपादक संदीप काळे, आदींनी फोनवरून शेटे परिवाराचे सांत्वन करुन सहवेदना व्यक्त केल्या.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button