बीडबीड जिल्हा

इनामी जमीन विल्हेवाट प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष – अँड. अजित देशमुख

बीड  )इनामी जमीन खरेदी विक्री प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यात मोठा काळाबाजार झाला आहे. याबाबत जन आंदोलनाने लक्ष घातले असून सविस्तर तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत महसूल विभागाच्या प्रधान सचिव यांना यासंबंधात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. आता तरी इनामी जमिनीतील काळाबाजार थांबवा, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

इनामी जमिनी काळाबाजार करण्याला गेल्या वर्षभराच्या काळात उत आला आहे. उप जिल्हाधिकारी भूसुधार हे त्यांच्या मोठमोठ्या बातम्या प्रकाशित होत असताना देखील थांबले नाही. पर्यायाने जिल्ह्यातील इनामी जमीन अनेकांच्या नावे हस्तांतरित करण्यात आल्या असल्याची देखील माहिती आहे.

जिल्ह्यात हा सातशे ते आठशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार आहे. इनामी जमिनीपैकी जवळपास चौदा हजार एकर जमीन आतापर्यंत अतिक्रमण खाली आली आहे. खालसा करण्यात आली आहे, ही बाब प्रचंड गंभीर अशी आहे.

गैरप्रकार थांबत नसल्याने यात अँड. देशमुख यांनी चार पाच दिवसापासून लक्ष घातल्यानंतर यात आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेअसल्याने पुढे काय होते, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. दरम्यान या प्रकरणात आपण आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

इनामी जमिनी गेल्या वर्षभराच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दुसऱ्याच्या नावे करण्यात आलेल्या आहेत. अनेक नियमांची यात पायमल्ली झाली आहेत. त्याच बरोबर अनेक संचिका देखील कार्यालयात उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. एकूणच हा प्रकार भयंकर असल्याने गैरकारभार करणाऱ्या उपजिल्हाधिकारी भूसुधार यांना कोणाचा पाठिंबा आहे ? असा प्रश्नही जन आंदोलनाने उपस्थित केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांचे हे आदेश निश्चितच फायद्याचे ठरतील .चांगली चौकशी होईपर्यंत आपण यात पाठपुरावा करू, यात आपल्याला उच्च न्यायालयाचा मार्ग देखील मोकळा असेल, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button