बीडबीड जिल्हा

डॉ. आर. बी. पवार आणि अँड. अजित देशमुख यांचा तिन कोविड सेंटरवर संयुक्त दौरा

बीड  ) कोरोणा महामारीच्या काळामध्ये सातत्याने ग्राउंड वर असणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार आणि ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी केज आणि धारूरच्या तीन सेंटरवर आज पाहणी केली. यावेळी रुग्णांबरोबर चर्चा केली. त्यांना दिले जाणारे जेवण, औषध उपचार, त्याचबरोबर त्या सेंटरवर असणारे कर्मचारी या सर्वांची पाहणी करण्यात आली.

कोरोना केअर सेंटर मध्ये असलेल्या रुग्णांना कसलीही काळजी न करता औषधे वेळेवर घेण्याविषयी यावेळी सांगण्यात आले. त्याच बरोबर रुग्णांनी घरी गेल्यानंतर देखील स्वतःला काही दिवस विलगीकरण ठेवावे. म्हणजे घरच्या लोकांना त्रास होणार नाही, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

आज पाहणी केलेल्या तीन कोविड सेंटर मध्ये प्रामुख्याने केज येथील शारदा कोविड सेंटर, पिसेगाव कोविड सेंटर आणि धारूर येथील सरकारी कोविड सेंटरचा समावेश होता. केज येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास आठवले त्याच प्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चौरे यांच्यासह दोन्ही ठिकाणचा सर्व स्टाफ हजर होता. धारुर येथे ही कोविड सेंटर वरील सर्व स्टाफ हजार होता.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आर. बी. पवार यांनी अनेक रुग्णांना स्वतः तपासले. रुग्णां बरोबर चर्चा करून त्यांना काही त्रास होतो का ? याची विचारपूस केली. तसेच त्यांना आरोग्य विषयक योग्य ती ते मार्गदर्शन केले. चौकशी केल्यानंतर आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी वेळेवर सेवा देत आहेत, असे सर्व रुग्णांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण लवकर उघडकीस यावेत, यासाठी तपासणी चालू आहेत. यामध्ये ज्यांना कोणाला लक्षण दिसत असेल त्यांनी तात्काळ तपासणे आवश्यक आहे. कोरोना बाधितांची संख्या आणि तपासणीतून निघणाऱ्या लोकांची संख्या आता दहा टक्क्यांच्या आसपास येत आहे. त्यामुळे जनतेने घेणे आवश्यक असल्याचे देखील यावेळी त्यांनी म्हटले.

कोरोना केअर सेंटर मूळे जनतेचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. हजारो रुग्ण कोविड सेंटरमध्ये विनामूल्य उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे कोविड सेंटरचा जनतेला फार मोठा फायदा झाल्याचे यावेळी अँड. अजित देशमुख यांनी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बोलताना म्हटले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button