बीड जिल्हा

सोमवार पासून बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल, जिल्हाधिकार्याचे नवीन आदेश

  • ज्याअर्थी , कोविड -19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून या कार्यालयाचे आदेश क्र .14 अन्वये बीड जिल्ह्यात दिनांक 15/06/2021 रोजी पर्यंत निबंध वाढविण्यात आलेले होते . मा . मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन , मंत्रालय , मुंबई यांचेकडील No. DMU / 2020 / CR.92 / DisM – 1 , दिनांक 04/06/2021 रोजीच्या संदर्भ क्र .15 च्या आदेशान्वये राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता निबंधाच्या कालावधी मध्ये राज्यातील वेगवेगळ्या विभागातील कोव्हीड -19 ची परिस्थिती लक्षात घेता राज्यात कोरोना मुळे लावण्यात आलेल्या निबंधांवर शिथीलता येत असून राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 स्तर ठरविले आहेत . त्या त्या स्तरानुसार संबधित जिल्हयांमध्ये निबंध शिथील करण्यात आलेले आहेत . ज्या अर्थी संदर्भ क्र .15 च्या मा . मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन , मंत्रालय , मुंबई यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार राज्य शासनाने खालीलप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे .

त्याअर्थी बीड जिल्हयामध्ये कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 8.40 % असुन , व्यापलेल्या ऑक्सीजन बेड्सची टक्केवारी 47.14 % इतकी असल्याने बीड जिल्हा महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र . 15 अन्वये घोषित करण्यात आलेल्या तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे . त्या नुसार बीड जिल्हयात कोविड -19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी लागु असलेले निबंध काही प्रमाणात शिथील करण्यात येत असून बीड जिल्हयात दिनांक 07.06.2021 रोजी पासून शासनाकडील पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत . त्याचे विवरण खालील प्रमाणे.

१.आवश्यक सेवेच्या पुरवठा यासंबंधीचे दुकाने असतात आणि प्रत्येक दिवशी सकाळी ७ते दुपारी ४ वाजेपर्यंत
२.आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर दुकाने /अस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत.
३.मॉल्स थेटर नाट्यग्रह इत्यादी पूर्ण बंद
४.रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 50% उपस्थित जेवणासाठी चार वाजेपर्यंत शनिवार-रविवार पूर्ण बंद.
५.सार्वजनिक स्थळे, खुले मैदान चालणे/दररोज सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत.
६. खाजगी कार्यालय सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरू राहतील. (सवलत दिलेले प्रवर्ग वगळून)
७. शासकीय कार्यालये तसेच परवानगी देण्यात आलेले खाजगी कार्यालय उपस्थिती ५०% शांततेने.
८. क्रिडा,केवळ मैदानी खेळासाठी सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत.
९. लग्नसमारंभ ५०% लोकांच्या उपस्थितीत (स्थानिक पोलिस प्रशासनाची परवानगी आवश्यक)
१०. अंत्यविधीसाठी २० लोकांची उपस्थिती.
११. स्थानिक संस्था सहकारी संस्था निवडणुकीसाठी ५०% क्षमतेने.
१२.बांधकाम क्षेत्रासाठी ज्या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या राहण्याची सोय असेल अशा ठिकाणी दुपारी चार वाजेपर्यंत.
१३. कृषी क्षेत्रासाठी प्रत्येक दिवशी सकाळी सात ते चार वाजेपर्यंत.
१४. ई- फार्मस सेवा प्रत्येक दिवशी सात ते चार वाजेपर्यंत.
१५. जमाबंदी व संचारबंदी,जमावबंदी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत व संचार बंदी पाच नंतर.
१६. व्यायाम शाळा, सलुन,ब्युटी पार्लर. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते चार वाजेपर्यंत.
१७. सार्वजनिक बस सेवा 100% असं क्षमतेने सुरू राहतील.
१८. मालवाहतूक, नियमितपणे
१९.खाजगी कार टॅक्सी बस सेवा याद्वारे आंतरजिल्हा प्रवास नियमितपणे सुरू राहील, (परंतु सदर वाहतूक मधून तर पाच मधील समाविष्ट असलेल्या जिल्ह्यात प्रवास थांब्यावर उतरणार असाल किंवा त्या जिल्ह्यातून प्रवास करणार असल्यास त्या प्रवास आवश्यक असेल.)
२०. उत्पादक घटक, नियमितपणे
२१. उत्पादन अत्यावश्यक वस्तू निर्मिती केंद्रे नियमितपणे.
२२. उत्पादन घटक इतर क्षेत्रातील सर्व घटक पन्नास टक्के कर्मचारी क्षमते सह.,
सदरचा आदेश हा दिनांक 07 जून 2021 पासून शासनाकडील पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहील . उपरोक्त प्रमाणे सूट देण्यात आलेल्या बाबी / आस्थापना / नागरिक यांनी शासनाकडुन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडुन वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले कोविड -19 वर्तणुकीचे / शिष्टाचाराचे पालन करणे बंधनकारक राहील . ज्या व्यक्ती । आस्थापना / घटक या कोविड -19 वर्तणुकीचे / शिष्टाचाराचे पालन करणार नाहीत त्या यापुर्वी निर्गमित करणेत आलेल्या आदेशासनुसार दंडास पात्र राहतील . तसेच सदर नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कोविङ -19 विषाणू संसर्ग अधिसूचना अस्तित्वात आहे तो पर्यंत बंद करणेत येईल . सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबधित विभागांची राहील . उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल . सदरचे आदेश आज दि .05.06.2021 रोजी माझ्या सही शिक्या निशी देण्यात आले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button