बीड जिल्हा

एआयएमआयएम च्या लढ्यास दुहेरी यश!

पक्षाध्यक्षांनी दंड कमी करण्यास तर जिल्हाध्यक्षांनी शिथीलता वाढविण्यास भाग पाडले!

बीड ) – केंद्र आणि राज्यात सातत्याने वाढविण्यात येणाऱ्या लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य, गोरगरीब, हातावर पोट असलेले, मोलमजूर यांच्या सह त्यांच्या कुटुंबियांसमोर उदरभरणाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला असल्याने ही परिस्थिती पाहून लॉक डाऊन उठवावे किंवा त्यात काही प्रमाणात शिथिलता द्यावी. अशी मागणी करताना एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबाद चे खासदार इम्तियाज़ जलील यांच्यासह पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून शासन-प्रशासनाकडे मोठ्या तळमळीने वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून मांडले तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची दुकाने अव्वाच्या सव्वा दंड आकारून सील केल्याने हा एक प्रकारे व्यापाऱ्यांवर अन्याय असल्याचे म्हणत याविरोधात प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज़ जलील यांनी लढा उभारून दंड कमी करण्यास भाग पाडले तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या मानाने सर्वात जास्त कालावधी पासून जिल्हा स्तरावर प्रशासनाकडून वारंवार लावण्यात येणाऱ्या लॉक डाऊन ला बीडची जनता सातत्याने तोंड देत असल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेसमोर मोठी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ यांनी ही बाब निवेदनाच्या माध्यमातून वारंवार शासन-प्रशासनाकडे मांडली शिवाय व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला. यामुळे उशिरा का होईना अखेर प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अशा पक्षाच्या दोन्ही शिलेदारांच्या प्रयत्नांची नोंद शासन-प्रशासनाला घ्यावी लागली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सील केलेल्या दुकानांना नाममात्र दंड आकारून उघडण्यात आले. तर बीड जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लॉक डाऊन मध्ये सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत शिथीलता वाढविल्याने एआयएमआयएम च्या लढ्यास दुहेरी यश आले आहे. यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह व्यापारी वर्ग आनंद व्यक्त करीत असून प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांचे आभार मानत आहे.
कोरोनामुळे गेली चौदा महिने देशवासीयांना अत्यंत परीक्षा पाहणारी व त्रास देणारी गेली आहे. जनतेसह शासन-प्रशासन सुद्धा समोर आलेल्या या अदृश्यरोग रुपी शत्रूपासून पुरते घायाळ व हतबल झालेले दिसून आले. यामुळे हातावर पोट असणारी जनता दोन वेळेच्या अन्नासाठी मोताद झालेली गेल्या चौदा महिन्यात दिसून आली मात्र या परिस्थितीचे उपाय म्हणून शासन-प्रशासनाकडून हवे त्या प्रमाणात जनतेला सहाय्य करण्यात आले नाही. त्यातच कोरोना चा संसर्ग वाढू नये पसरू नये, याकरीता शासन-प्रशासन दिवसेंदिवस लॉक डाऊन चे नियम व निर्बंध अधिकाधिक कडक करू लागल्याने अवस्था आणखीन बिकट होऊन गेली होती. ही परिस्थिती पाहता एआयएमआयएम पक्ष देशभरात जनतेसाठी आवाज उठवू लागला, वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ लागला, जेणेकरून जनतेचे हाल थांबावे. यात महाराष्ट्रात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज़ जलील यांनी जनतेसाठी वेळोवेळी रस्त्यावर येऊन आवाज उठविला. प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना आकारला गेलेला अव्वाच्या सव्वा दंड कमी करण्यास भाग पाडले. तसेच लॉक डाऊन मधून शिथीलता वाढविण्यास भाग पाडले. आपल्या प्रदेशाध्यक्षांचे कार्य पाहून पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनीही सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांवर होत असलेला अतिरिक्त लॉक डाऊन चा परिणाम पाहून जिल्हा पातळीवर याविरोधात लढा सुरू केला. गेल्या महिनाभरात भाऊंनी इतर जिल्ह्यांच्या मानाने बीड जिल्ह्यात लावण्यात आलेला अतिरिक्त लॉक डाऊन एक तर मागे घेण्यात यावा किंवा शिथीलता वाढवावी अशी मागणी वारंवार लावून धरली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला वेळोवेळी निवेदने दिली आणि उशिरा का होईना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह जिल्हाध्यक्षांच्या या लढ्यास दुहेरी यश प्राप्त झाले. यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह व्यापारी वर्गही आनंद व्यक्त करत असून प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज़ जलील आणि जिल्हाध्यक्ष ॲड शेख शफीक भाऊ यांचे आभार मानत आहे.
भाऊ खरच तुम्ही भाऊ आहात!
एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड शेख शफिक यांना भाऊ का म्हटले जाते हे कोरोना काळात गेल्या चौदा महिन्यात त्यांनी केलेल्या कार्यामध्ये दिसून आले. तसे पाहता शेख शफीक हे एका सर्वसामान्य कुटुंबातून राजकीय क्षेत्रात पुढे आलेले व्यक्तिमत्व. सर्वसामान्य परिवारातून आल्याने सर्वसामान्य गोरगरिबांच्या हाल-अपेष्टा त्यांना जवळून माहित आहे. अनेकदा त्यांनी सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे. बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेत कायद्याची पदवी मिळविली. सोबतच समाजासाठी काहीतरी चांगले करावे हा ध्यास मनात असल्याने शिक्षण घेता घेताच राजकारणात शिरून मोठ्या प्रमाणात समाजकारण करू लागले. एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर तर अक्षरशः झपाटल्यासारखे त्यांनी स्वतःला जनतेसाठी वाहून घेतले. अडल्या-नडलेल्यांची कोणतीही कामे असो रात्री-अपरात्री कोणी कधीही मोबाईलवर संपर्क साधला की शफीक भाऊ सेवेत हजर. २४ तास स्वतःला जनसेवेत वाहून घेतलेल्या भाऊंनी कोरोना काळात जनतेची अवस्था जवळून पाहिली. स्वतःही कोरोनाच्या कचाट्यात आल्यानंतर त्याच्याशी दोन हात करत त्याच्यावर मात केली. आणि पुन्हा नव्या जोमाने जनतेच्या सेवेत रुजू झाले. गेल्या महिन्या दीड महिन्यापासून तर सर्वसामान्य गोरगरिबांसह व्यापाऱ्यांवर लॉक डाऊन मुळे होत असलेला अन्याय दूर करण्याकरिता जिल्हा प्रशासन सोबत लढाच सुरू केला आणि अखेर त्यांच्या लढ्यास यश येऊन उद्या सोमवार दिनांक ०७ जून पासून सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत लॉकडाऊन मधून सर्व व्यापाराला जिल्हा प्रशासनाने सुरू ठेवण्यास मान्यता दिली. यामागे शफिक भाऊंच्या अविरत संघर्षाचा मोठा वाटा आहे. भाऊ मग तो बहिणीचा असो की भावाचा. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा असतो तो म्हणजे भाऊ. म्हणूनच शेख शफीक यांना भाऊ ही उपाधी मिळाली ती उगीच नाही. असे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button