गेवराईबीड जिल्हा

पारदर्शकपणाचा आव आणणार्या गेवराई नगरपालिकेकडून घरकुल योजनेची माहिती देण्यास टाळाटाळ

राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय दाभाडे यांचा आरोप

गेवराई, ) प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत घरकुलाची कामे मंजुर करताना गेवराई नगर परिषदेत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. या बाबतच्या अनेक तक्रारी लाभार्थ्यांनी दिलेल्या असतानाही या बाबत कारवाई होत नाही. माहिती अधिकार अंतर्गत गेवराई नगर पालिकेला घरकुल योजनेअंतर्गत मिळालेला निधी, पात्र लाभार्थ्यांना वाटप केलेला निधी, पात्र लाभार्थ्यांची यादी त्याचबरोबर अपात्र आणि अर्ज फेटाळलेल्या लाभार्थ्यांची यादी बाबत माहितीची मागणी केली असता पालिकेकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. एकीकडे पारदर्शकपणाचा बुरखा पांघरून सावपणाचा आव आणार्याचा भ्रष्ट चेहरा यानिमित्ताने गेवराईकरांना उघड झाला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय दाभाडे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत गेवराई नगर पालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक संगणमताने गैरव्यवहार झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना या योजनेतून खिरापत वाटप करून पात्र आणि बेघर असलेल्या गोर-गरीब लाभार्थ्यांना मात्र योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप करताना गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दत्तात्रय दाभाडे यांनी याप्रकरणी दि.२६/४/२०२१ रोजी गेवराई नगर परिषदेत माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मिळणे बाबत अर्ज केला होता. सतत पाठपुरावा करूनही विहित मुदतीत ही माहिती मिळाली नाही. शेवटी ३ जून रोजी पाठपुराव्यामुळे केवळ अर्धवट माहिती देवून बोळवण केल्याचा आरोप त्यांनी केला.

या बाबत अधिक माहिती देताना दत्तात्रय दाभाडे यांनी सांगितले की प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत गेवराई नगर पालिकेने मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला आहे. अनेक बोगस लाभार्थ्यांच्या नावे घरकुल मंजुर करून त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता कार्यकर्त्यांना अक्षरशः पालिकेने खिरापत वाटप केली आहे. पात्र लाभार्थी आजही योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, अनेकांना दुसरा आणि तिसरा हप्ता मिळत नाही, दलालांचा सुळसुळाट वाढला असून टक्केवारी दिल्याशिवाय पालिकेत कामे होत नाहीत. याप्रकरणी माहिती अधिकार कायद्यात पात्र घरकुल धारकांची यादी पालिकेने दिली नाही. वेगवेगळ्या टप्प्यावर लाभार्थ्यांना दिलेल्या अनुदानाची माहिती पालिकेने लपविली आहे. अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज कोणत्या कारणाखाली नामंजुर केले त्याचीही माहिती पालिका देत नाही. एकंदरितच ही माहिती लपविण्याचा प्रयत्न म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप दाभाडे यांनी केला आहे. याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार देवून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याचेही त्यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button