बीडबीड जिल्हा

पंधरा दिवसांत पीक कर्ज वाटत पूर्ण करा :-राजेंद्र आमटे

अन्यथा बँक समोर शिवसंग्राम आंदोलन करणार

बीड ) सर्व बँकांना 1 मे ते 1 जून या कालावधीत संपूर्ण शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासंदर्भात शासनाचे निर्देश असताना प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी आजही 90-95 % शेतकरी पीक कर्ज पासून वंचित आहेत. शेतकरी पावसामुळे बि-बीयाने खते खरेदी करण्यासाठी खाजगी सावकाराच्या दारात जाऊन बसण्याची वेळ बीड जिल्हाप्रशासन व बँक अधिकारी यांनी शेतकऱ्यांनवर आणली आहेत हे तात्काळ थाबवा व प्रशासन व बँक मॅनेजर यांनी संपूर्ण जिल्हातील शेतकऱ्यांचे नियोजन करून तात्काळ शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज वाटप व जुन्या कर्जाचे पुनर्गठन करून संपुर्ण शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात यावे या मागणीसाठी शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने मा आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार सय्यद याना निवेदन देण्यात आले या वेळी शेतकऱ्यांना पंधरा दिवसात नवीन पीक कर्ज वाटप व जुन्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे अन्यथा शिवसंग्राम शेतकरी आघाडी शेतकऱ्यांना समवेत बँकां समोर ठिय्या आंदोलन करेल असा इशारा शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,शिवसंग्राम जेष्ठ नेते गोपीनाथराव घुमरे, शिवसंग्राम नेते बळीराम थापडे,नामदेव धांडे, महादेव कानडे, शिवसंग्राम शेतकरी आघाडी कायदेसल्लागार शरद तिपाले, शिवसंग्राम युवा नेते विजय सुपेकर, मोहन गव्हाणे,लाटे तात्यासाहेब, कृष्णा मसुरे,महेश थापडे आदींच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button