बीड जिल्हा

तीन दिवसात अँड. अजित देशमुख यांच्या सात कोविड सेंटरला भेटी

बीड ( प्रतिनिधी ) कोरोना केअर सेंटरच्या पाहणीसाठी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी तीन दिवसात सात ठिकाणी दौरा केला. याठिकाणी त्यांनी रुग्ण आणि बाहेर थांबलेले त्यांचे नातेवाईक यांच्या सोबत चर्चा केली. त्याच बरोबर आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यां बरोबर देखील संवाद साधला.

यापैकी एक दिवशी तीन, त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेकनूर येथील दोन कोरोना केअर सेंटर आणि तिसऱ्या दिवशी वडवणी येथील दोन कोरोना केअर सेंटरला भेटी दिल्या. वडवणी आणि नेकनूर येथे दोन दिवस मोटर सायकलवर जाऊन भेटी दिल्या. रुग्णांना आधार देणे, त्यांना नियम पाळण्याविषयी आवाहन करणे, त्याच बरोबर नातेवाईकांनी गर्दी करू नये, यासाठी देखील देशमुख कोरोना केअर सेंटरवर आग्रही असतात.

कोरोणा काळामध्ये अँड. देशमुख यांनी दिलेल्या भेटी या रुग्णांसाठी जेवढ्या महत्त्वाच्या झाल्या, तेवढ्याच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्याच बरोबर नातेवाईकां बरोबर देखील देशमुख प्रत्येक ठिकाणी चर्चा करत आहेत. त्याच ठिकाणी काही समस्या असल्यास त्याचे निराकरण करणे देखील यामुळे सोपे गेले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button