बीडबीड जिल्हा

बीड जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील वाहन चोरी करणारी टोळी गजाआड

02 चार चाकी व 08 दुचाकी वाहने जप्त

बीड जिल्हायात काही दिवासा पासुन मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने मा . पोलीस अधीक्षक साहेब , बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी , कर्मचारी यांना सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या . अशा प्रकारच्या गुन्हयाच्या संदर्भाने आरोपी बाबत माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा , बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , माजलगाव ग्रामीण गुरन 02/2021 कलम 379 भादवि व गुरन 185/2020 कलम 379 भादवि मधील पाच महिण्यापुर्वी चोरी गेलेल्या मोटार सायकल इसम नामे विष्णु भगवान केकाण रा.चाटगाव ता धारुर व त्याचा एक साथीदार यांनी चोरुन नेली असुन विष्णु केकाण सध्या त्याचे घरी आला आहे , अशी खात्रीलायक बातमी मिळाले वरुन स्थानिक गुन्हे शाखा , बीड येथील अधिकारी व कर्मचारी यांना नेमुन चाटगाव ता , धारुर येथे जाऊन विष्णु भगवान केकाण यास शिताफिने ताब्यात घेऊन त्यास पात्रुड ता माजलगाव येथुन चोरुन आणलेल्या व इतर ठिकाणी चोरलेल्या वाहना बाबत विचारपुस केली असता , त्याने सांगितले की , तो व त्याचा साथीदारा दोघे सोबत जाऊन पात्रुड ता.माजलगाव , लातुर , लोणावळा जि.पुणे , औंढा जि . हिंगोली येथुन दोन चाकी , चारचाकी वाहने चोरी केल्याचे सागितले . त्याचे कडुन तीन मोटार सायकल , बोलेरो पिकअप , टाटा सुमो अशी चार चाकी व दुचाकी वाहने मिळाली , तसेच त्याचे इतर01 ) फरार साथीदार 2 ) राजेंद्र अशोक शेळके 3 ) शेख कलीम हुसेन यांचे कडुन पाच मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत . सदर तीन आरोपी यांचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या 08 मोटरसायकल , 01 टाटा सुमो , 01 पिकअप बोलेरो असा एकुण 13,40,000 / – रुपये किमती मुद्येमाल जप्त केला आहे . जप्त करण्यात आलेल्या वाहनाचे संदर्भाने बीड जिल्हयातील माजलगांव ग्रामीण पोस्टेला 02 गुन्हे , लातुर जिल्हयातील MIDC व विवेकानंद चाक पोलीस स्टेशनला 03 गुन्हे , पुणे जिल्हयातील लोणावळा पो , स्टे . ला 01 गुन्हा व हिंगोली जिल्हयातील आंढा नागनाथ पो.स्टे.ला 01 गुन्हा असुन एकुण 07 वाहन चोरीचे गुन्हे उघड केले आहत .

1 ) हिरो होन्डा कंपनीची स्पेल्डर जिचा चेसि नं . 01L20F07803 इंजि . नं . OIK 18E44728

2 ) बजाज कंपनीची प्लसर मोटार जिचा चेसीस नंबर MD2DSDJZZPCD19310 वरील दोन वाहनांचे संदर्भाने दाखल गुन्हे संदर्भात माहिती घेणे चालु आहे . वरील प्रमाणे 02 चार चाकी व 08 दुचाकी वाहने व 03 आरोपी पुढील तपासकामी पो.स्टे . माजलगांव ग्रामीण येथे हजर केले आहेत . पुढील तपास माजलगांव ग्रामीण पोलीस करीत आहेत ,

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button