ब्रेकिंग न्यूज

पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा आष्टी येथे निषेध

आष्टी ,परतुर तालुक्यातील आष्टी येथे दि.13 रोजी निवेदन सादर करण्यात आले.यामध्ये जाफराबाद येथील पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या वाळू तस्कराकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता.या हल्ल्यात ज्ञानेश्वर पाबळे हे गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,अवैध वाळू वाहतुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला ,या हल्ल्याचा आष्टी पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवत पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.संबधीत घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करून पत्रकार संरक्षण व वाळू तस्करी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळंके,सचिव राजेश नायक,उपाध्यक्ष गौतम शेळके,जेष्ठ पत्रकार हरुणभाई कच्ची,अशोक दहीभाते,उद्धव डोळस,बाबासाहेब बागल, अर्जुन थोरात,अंगद मुंढे, रमेश अंकुशकर, मारोती जवळकर,गोपाळ पोटे,सुधाकर जाधव आदींची उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button