गेवराईबीड जिल्हा

अमरसिंह पंडित यांचा सन्मान आम्ही करतो पण तुम्ही त्यांची किती परीक्षा घेणार?

ना.धनंजय मुंडेंनी दिले अमरसिंह पंडित यांच्या सन्मानाचे शुभसंकेत

  • शारदा प्रतिष्ठानच्या वतीने कोविड योध्या व धनंजय मुंडे यांचा सत्कार.

गेवराई, – कोविड योध्यांचा सन्मान करण्यांची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भैय्यासाहेबांनी दिली आहे. निवडणुकीतील पराभवानंतर सुध्दा त्यांनी आपल्या मातीतील माणसांशी नाळ कायम ठेवत लोकसेवेचा वसा सोडला नाही. कोरोनाच्या संकट काळात त्यांनी केलेल्या सामाजिक कामामुळे गेवराईत माणुसकी उफाळून आली, लोक त्यांचे काम विसरणार नाहीत. कोरोनाच्या संकटकाळात भैय्यासाहेबांनी केलेल्या कामाचा सन्मान तर नक्कीच झाला पाहिजे परंतु लवकरच त्यांचा सन्मान करण्यासाठी मी गेवराईत येईल असे प्रतिपादन करून माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या सन्मानाचे वेगळे राजकीय शुभसंकेत ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात दिले. शारदा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या नागरी सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी कोविड योध्यांचा सन्मानही करण्यात आला.

शारदा प्रतिष्ठानच्यावतीने गेवराईमध्ये आयोजित केलेल्या कोविड योध्दा सन्मान सोहळा आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजना सुरु केल्याबद्दल ना.धनंजय मुंडे यांचा नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा गेवराई विधानसभा मतदार संघात रंगली आहे. यानिमित्ताने ना.धनंजय मुंडे यांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांच्याबद्दल भाषणात शुभसंकेत दिल्याचे बोलले जात आहे.

लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करणाऱ्या अमरसिंह पंडित यांचा सन्मान आम्ही करतो पण तुम्ही त्यांची किती परिक्षा घेणार ? असा भावनिक सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थितांकडे बोट करून विचारला. महाराष्ट्रात खाजगी कोविड सेंटर सुरु करणारा पहिला नेता अमरसिंह पंडित आहे. त्यांच्या माध्यमातून गेवराईत माणुसकीचे दर्शन पाहिला मिळाले, त्यांनी कोरोना महामारीत उल्लेखनीय काम करणार्यांचा सन्मान केला. परंतु त्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आमची असून लवकरच गेवराईत येवून त्यांचाही सन्मान करण्यात येईल असे सूचक वक्तव्य ना.धनंजय मुंडे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आ. सतीश चव्हाण, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, शिवाजी सिरसाट, माजी आ पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button