बीडबीड जिल्हा

शाहूनगर-पेठबीड भागात नगराध्यक्षांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन संपन्न

आरोग्य केंद्रामुळे स्थानिक नागरिकांची आरोग्य विषयक अडचण दूर होणार - नगराध्यक्ष

बीड,बीड शहरातील शाहू नगर आणि पेठ बीड भागात नागरिकांना सोयीच्या यादृष्टीने दोन्ही भागात नगर पालिकेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत असून दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

शाहू नगर भागात तसेच पेठ बीड भागात गोर गरीब आर्थिकदृष्ट्या मागासलेले, दुर्बल घटकातील नागरिक मोठ्या संख्येने राहतात. हे दोन्ही भागातील नागरिकांची खूप दिवसांची मागणी गृहीत धरून याभागात आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष बोलतांना म्हणाले की, शाहू नगर आणि पेठ बीड हे दोन्ही भाग जिल्हा रुग्णालयापासून बऱ्याच दूर अंतरावर असल्याने रुग्णाला बीड जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात.या भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच अडचणीच्या काळात योग्य वेळी उपचार मिळावेत यासाठी बीड नगर पालिका प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. यादोन्ही ठिकाणी होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे आसपासच्या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.
शाहू नगर भागात आणि पेठ बीड भागात नगर पालिकेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले व नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले.
याप्रसंगी नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, ज्येष्ठ माजी नगरसेवक बलभीमराव (दादा) जाहेर, पेठ बीड पो. स्टे.चे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सय्यद सादेक अली, अमृत काका सारडा, सतिष पवार, शिवाजीराव जाधव,
नगरसेवक भास्कर जाधव,किशोर पिंगळे, शेख इलियास, विकास जोगदंड, प्रेम चांदणे, संतोष गायकवाड, शुभम धूत, बाळासाहेब गुंजाळ,मुन्ना इनामदार, राणा चव्हाण, अमोल पौळ, नबील जमा यांच्यासह बीड नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button