बीडबीड जिल्हा

इंग्रजी शाळेने फिस मध्ये ५० टक्के सवलत द्यावी – अशोक हिंगे, मनोज जाधव

बीड (प्रतिनिधी) करोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्हा, राज्य, देशासह जगावर काय संकट ओढवले याची आपल्याला कल्पना सर्वानाच आहे. या संकट काळात अनेकांना आपल्या नोकरी-व्यवसाय पासून मुकावे लागले तर काही लोकांना अर्ध्या पगारी वर काम करावे लागले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनी आपली दैनंदिन उपजीविका भागवायची कशी असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या संकटात पालक देखील सापडला आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. याकारणाने पालकांना आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरणे जिकरीचे झाले आहे. या आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांनी एकत्र येत आज जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
          शैक्षणिक संस्था मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यालायने निर्देश देऊनही शिक्षण संस्था आपल्या शुल्का मध्ये एक रुपयाही कमी करण्यास तयार नाही. ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरल्या नाहीत त्या सुविधांचे पण शुल्क मागील वर्षी शिक्षण संस्थांनी वसूल केले. संकटाच्या काळामध्ये शिक्षणासारख्या पवित्र व्यवसायामध्ये सुद्धा संस्था आपला नफा सोडायला तयार नाहीत. शिक्षण संस्थांच्या या आडमुठेपणाच्या धोरणाच्या  विरोधात आता पालक आक्रमक पवित्रा घेत असताना दिसून येत आहे. पालकांनी आम्हाला कोरोना काळातील फिस मध्ये 50 टक्के सवलत द्यावी या मागणी साठी संतप्त पालकांनी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या कडे निवेदन घेऊन गेले या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना देखील शैक्षणिक शुल्कात कपात करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य ते पाऊले उचलावी अशी मागणी करण्यात आली. या वेळी अशोक हिंगे आणि आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी देखील पालकांच्या समस्या मांडल्या या वेळी पालक समितीचे प्रदीप धांडे , सचिन बोर,रामदास दोडके,जयप्रकाश जाजू,शीतल पिंगळे, सचिन बागल, मिलिंद बनसोडे, शिलाताई मुंढे अदी सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फिस सवलतीच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा
आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना शैक्षणिक फी मध्ये सवलत द्यावी या मागणी साठी मागील काही दिवसा पासून लढा उभा केला जात आहे. या लढ्याला वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे, शिवसनेचे सुनील सुरवसे , नगरसेवक रमेश चव्हाण,   सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे, रामनाथ खोड, संतोष जाधव यांनी पाठिंबा दिला आहे.
कोरोना महामारीत आणि सततच्या लॉक डाऊन मुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी , कामगार सर्वच स्तरातील वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत इंग्रजी शाळांची भरमसाठ फीस भरणे पालकांना अशक्य आहे. फिस न भरल्यास शाळा विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षण रोखता आहे. ही संस्थाचालकांची दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा अशोक हिंगे यांनी दिला आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक भावनेतून शाळा प्रशासनाने पुढे येत पालक आणि शाळा यांच्या समन्वयाने यातून मार्ग काढत शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात यावी त्याच बरोबर हा तिढा सोडवण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेत पालक आणि शाळा प्रशासन यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढावा असे मत पार्टी कार्यकर्ते मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे.
प्रतिक्रिया- प्रदीप धांडे, पालक 
या कोरोना काळात अनेक जण आजाराने त्रस्त आहेत बऱ्याचश्या लोकांच्या घरातल्या सदस्यांना कोरणा ची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातच ऑनलाइन शिक्षण असल्यामुळे पाल्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे मोबाईल ,रिचार्ज व इत्यादी साधना साठी आमचा आधीच मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. आता आमची शैक्षणिक शुल्क भरण्याची आर्थिक स्थिती राहिली नाही तेव्हा आम्हाला शैक्षणिक शुल्कामध्ये 50 टक्के सवलत देण्यात यावी.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button