बीडबीड जिल्हा

आम्हाला शैक्षणिक शुल्कात सवलत द्या , पालकांची मागणी

पोदार इंग्लिश स्कूल व्यवस्थापनाला पालकांचे निवेदन

फिसचा तिढा सुटेपर्यंत विद्यार्थ्याचे शिक्षण थांबवू नका – मनोज जाधव
बीड ,१५ जून पासून शैक्षणिक वर्षाला ऑनलाईन पद्धतीने सुरवात झाली आहे. मात्र अजूनही पालक आणि शाळा यांच्यातील शुल्का बाबद्चा तिढा सुटताना दिसत नाही. कोरोना संकट काळात एक दिवस ही शाळा सुरू नव्हत्या शाळांनी मागील शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने शिकवणी घेत कसे बसे पूर्ण केले परंतु या काळात पूर्ण विषयाची शिकवणी झाली नाही. दोन – चार विषयाच्या ऑनलाईन शिकवण्या झाल्या मग आमची मुले शाळेत आली नाहीत . शाळांचाही बरचासा खर्च वाचला आहे. तर मग आम्ही पूर्ण फी का भरावी असा प्रश्न पालकांनी पोदार इंग्लिश स्कूल व्यवस्थापनाला विचारला या कोरोना संकट काळात पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तेव्हा आम्हाला शैक्षणिक शुल्कात सवलत द्या अशी मागणी या वेळी करण्यात आली या वेळी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी ही पालकांच्या समस्या शाळा व्यवस्थापना समोर मांडल्या.
        गत वर्षा पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सततचे लॉक डाऊन या मुळे सर्वसामन्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. या आर्थिक संकटाच्या झळा पालकांना देखील सोसाव्या लागत आहेत. आपली दैनंदिन उपजीविका भागवायची की मुलांना शिक्षण द्याचे असा प्रश्न पालकांना सतावत आहे. यात इंग्रजी शाळांकडून सतत पालकांना फी साठी तकादा लावला जात आहे. यात शाळा वर्ष भर बंदच होत्या मग शाळेचे अनेक खर्च वाचले आहेत. कोरोना पूर्वीच्या काळात आम्ही पालकांनी शाळेला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांना कधीही फी मध्ये सवलत मागितली नाही. मात्र आता हा काळा पालकांसाठी संकटाचा आहे अश्या वेळी ज्या पालकांच्या जीवावर या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या त्या पालकांना शाळेने मद्दतीचा हात देणे गारजेचे आहे. या वेळी पालकांनी आक्रमक भूमिका घेतना “आम्ही शेंगा खाल्या नाहीत आम्ही टरफल उचलणार नाहीत ” अशी भुमका घेतली येणाऱ्या काळात लवकरात लवकर आम्हाला शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील पालकांनी दिला आहे.
फिसचा तिढा सुटेपर्यंत विद्यार्थ्याचे शिक्षण थांबवू नका – मनोज जाधव
फिस बाबदचा तिढा शाळांनी पालकांना विचारात घेऊन लवकरात लवकर सोडवावा हा काळा सर्वासाठीच परीक्षा पाहणार आहे. यातून आपण लवकरच सावरू परंतु आता आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन शाळांनी सामजिक बधीलकी जोपासावी शाळांनाही खर्च आहे. परंतु कोरोना काळात शाळा बंद असल्याने शाळाचाही खर्च काही प्रमाणात वाचला आहे. तेव्हा त्यांनी आपल्याशी जोडले गेलेल्या पालकांना मदतीचा हात द्यावा आणि हा तिढा अजा नाही उद्या सुटणार आहे. तो पर्यंत विद्यार्थ्याना शिक्षणा पासून वंचित ठेवू नये असे केल्यास शिक्षण हक्क कायद्याचे उल्लघण होईल आणि अश्या शाळा विरोधात आम्हाला आंदोलन पुकारावे लागेल असा इशारा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button