बीडबीड जिल्हा

पेट्रोल, डिझेल, गॅस खाद्यतेलाच्या दरवाढ विरोधात एआयएमआयएम चे जिल्हाभरात यल्गार

मोदींच्या प्रतिमेला लाडू भरवून फुलांची भेट देत केला निषेध!

बीड ) – सततच्या लॉक डाऊन मुळे अगोदरच जनता हवालदिल झाली असताना शासनाकडून पेट्रोल, डिझेल, गॅससह खाद्यतेलांचे दर दिवसेंदिवस सातत्याने वाढविले जात आहे. पेट्रोल ने शंभरी पार केली आहे, डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे, गॅसचे दर हजाराला जाऊन टेकले आहे तर खाद्यतेल दिडशे पार गेले आहे. यामुळे महागाई बोकाळली असून ती कमी करण्याकरिता पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्यतेलांचे दर कमी करण्यात यावे आणि जनतेला  महागाईच्या जोखडातून वाचवावे. अशी मागणी करत एआयएमआयएम पक्षाध्यक्ष तथा खा. बॅरिस्टर अल्हाज असदुद्दीन ओवैसी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खा. इम्तियाज जलील, महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, राज्‍य पक्षप्रवक्ते तथा माजी आ. वारिस पठाण आणि मराठवाडा विभागीय अध्यक्ष फिरोज लाला यांच्या आदेशानुसार बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी जिल्हाभरात पक्षातर्फे केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाविरोधात यल्गार आंदोलन करत पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला लाडू भरवून फुलांची भेट देत निषेध नोंदवला. बीड शहरासह जिल्हाभरात हे आंदोलन करण्यात येवून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पेट्रोलियम विभागाचे केंद्रीय सचिव आणि विक्रीकर विभागाचे सचिव यांना निवेदन पाठवण्यात आले.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मार्च २०२० पासून आपल्या देशात कोरोना महामारी मुळे सातत्याने लॉक डाऊन लावण्यात येत आहे. या अवस्थेमध्ये फक्त नोकरदार वर्ग आणि राजकीय लोकप्रतिनिधींना वगळता समाजातील सर्व घटक ज्यामध्ये व्यापारी वर्ग, हातावर पोट असणारा मजदूर वर्ग, ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, हातगाडे, टपरी इत्यादींवर लहान-सहान व्यवसाय करून गुजराण करणारे श्रमिक, या सर्वांसमोर मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांसमोर दिवसातील दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. आर्थिक चणचणीमुळे सर्वांचे कंबरडे मोडले असून सर्वजण शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या पार पोखरले गेले आहेत. अशा अवस्थेमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्यतेलांचे दर दिवसेंदिवस सातत्याने वाढत चालले आहे. यामुळे किराणा पासून भाजीपाला पर्यंत सर्वांचे दर सर्वसामान्यांसाठी आटोक्याबाहेर झाले आहे. या प्रतिकूल स्थितीतून देशाच्या जनतेला बाहेर काढण्यासाठी वाढती महागाई कमी करणे अत्यावश्यक आहे आणि महागाई तेव्हाच कमी होऊ शकते जेव्हा पेट्रोल, डिझेल, गॅससह खाद्यतेलांचे दर शासनाकडून कमी करण्यात येईल. इंधन तेलांसह खाद्यतेलांचे दर कमी केले तर निश्चितपणे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाई वर काही प्रमाणात का होईना अंकुश लागेल. आजमितीला खाद्यतेलांसह पेट्रोल, डिझेल व गॅस हे जिवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट झाले आहे. आमच्या माहितीप्रमाणे केंद्रशासन पेट्रोल वर ३३ ₹ प्रती लिटर तर डिझेल वर ३२ ₹ प्रती लिटर कर आकारत आहे. तसेच राज्यशासन (VAT) व्हॅट चार्ज च्या नावाखाली पेट्रोल वर २५% प्रती लिटर तर डिझेल वर २२% प्रती लिटर कर आकारीत आहे. केंद्रशासन व राज्यशासन यांनी पेट्रोल व डिझेल वरील आपआपले कर कमी करुन सध्या आकारण्यात येत असलेल्या किंमतीमध्ये निदान २५% घट किंवा कपात करावी. जेणेकरून वाढत्या महागाईतून सर्वसामान्य जनतेची काही प्रमाणात का होईना सुटका होऊ शकेल. परंतु पेट्रोल व डिझेल वरील केंद्र आणि राज्य शासनाचे कर दोन्ही सरकारे कमी करत नसल्याने संपूर्ण देशभरात महागाई शिखरावर पोचली आहे. म्हणून दोन्ही सरकारांच्या धोरणाविरोधात एआयएमआयएम पक्षाने संपूर्ण बीड जिल्ह्यात एकाच वेळी यल्गार आंदोलन करत पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला लाडू भरवून फुलांची भेट देत निषेध नोंदवितांना पक्ष कार्यालयापासून पेट्रोल पंपा पर्यंत दुचाकी ढकलत नेऊन पंपावर पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांना सुद्धा लाडू व फुल भेट देण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅससह खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यात यावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय सचिव व विक्रीकर विभागाचे सचिव यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनावर ॲड. शेख शफीक भाऊ यांच्यासह  एजाजखन्ना भैया, नगरसेवक शेख मतीन, नगरसेवक हाफीज अश्फाक, नगरसेवक अजहर मोमीन, अब्दुस सलाम सेठ, मुफ्ती वाजेद, शेख शाकीर, रहेमत पठाण, शिवा बोरकर, फैय्याज खान, फारुख खान, शेख सलमान, जाकीर तांबोळी, नईम मेंबर, नवाब भाई, सोफियान मनियार, सोहेल मोमीन, मुदस्सीर शेख, बासित भाई, शाहनवाज खान, सोहेल शिकलकर, जैफ सिद्दिकी, नवाब शिकलकर, सय्यद इलयास आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button