गेवराईबीड जिल्हा

योगामुळे जीवनशैली बदलते -जिजा नाटकर आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

गेवराई -) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा ६ वा वर्धापन दिन २१ जून रोजी गेवराईत साजरा करण्यात आला. उपस्थितांना पतंजली योग समितीचे योग शिक्षक जिजा नाटकर यांनी योग आणि प्राणायाम , आसने, सूर्यनमस्कार, मंत्र,शांतीपाठ, हास्यासन,तालिकावाद नाचे लाभ प्रात्याक्षिकासह सादर केले..योगा -प्राणायाम दैनंदिन जीवनात समाविष्ट करून आदर्श जीवनशैली बनवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी योग अभ्यासक इंजि शरयू निकम यांनी पादहस्तासन, चक्रासन, वीरभद्रासन, वृक्षासन आदी योगासने करून दाखवली. सुरुवातीस भारतमाता प्रतिमेस नारी संघटनच्या सौ. सीता महासाहेब यांनी पुष्पमाला अर्पण केली. चित्रपट – मालिकांमधील अभिनेते अशोक कानगुडे, जेष्ठ चिकित्सक डॉ. शिवराम खरात,अॅड. सुभाष निकम, नगरसेवक श्यामकाका येवले, उद्यान पंडित- कृषितज्ज्ञ राजेंद्र आतकरे,नाभिक कर्मचारी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम सोलाने, सौ. सीता महासाहेब, व्यापारी महासंघाचे सचिव सुरेंद्र रूकर, मंगलनाथ मल्टीस्टेटचे चेअरमन पंडित केशव , शिवनेरी लॉन्सचे संचालक विठ्ठल मोटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट यांच्या वतीने व्यापारी महासंघ, जय गुरुदेव ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई येथील ताकडगाव रोडवरील डॉ. मुरलीधर शेषराव मोटे यांच्या शिवनेरी लॉन्स सभागृहात सोमवार दि. २१ रोजी सकाळी ५.३० ते ७ यावेळेत सातवा आंतरराष्ट्रीय योगा दिन कोरोना -19 च्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी भारत स्वाभिमान ट्रस्टचे तालुका प्रभारी डॉ. मुरलीधर मोटे, पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी प्रा. राजेंद्र बरकसे, सचिव प्रा.सुरेश पाटील,व्यापारी संघटनेचे सचिव सुरेंद्र रुकर , शिवनेरी लॉन्सचे संचालक विठ्ठल मोटे, भीमजीभाई पटेल, अशोक गायकवाड, रामजिजा चाळक, प्रा. रामलिंग गुळवे, नितीन कुल्थे, अमित शिखरे, श्रीराम आरगडे, डॉ. शेषराज मोटे, रोहित मोटे, दीपक पुरी, सुरेश मानधने, शिवाजी वावरे, बाबुराव नागरगोजे, अंगद पवळ, मस्के, विनायक स्वामी,तात्यासाहेब मेघारे, सखाराम कानगुडे, सावता नाईक , कल्याण हाडुळे, हनुमान तौर, राघव मोटे, बळीराम चाळक यांच्यासह योग शिक्षक , योगसाधक स्त्री -पुरुष उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button