जालनामराठवाडा

शिक्षणापासून शेकडो विद्यार्थी वंचित!

ऑफलाईन शाळा सुरु करा,व्यवस्थापन समितीने घेतला ठराव

  • गोळेगाव व परिसरात टॉवर नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा उडाला बोजवारा

आष्टी) मार्च २०१९ पासून बंद असलेल्या शाळा चालू शैक्षणिक सत्रात सुरु होतील असे सर्वानाच वाटले ,परंतु कोरोना प्रादुर्भाव कमी होऊन देखील शासनाने शाळा सुरु करण्यास मान्यता न दिल्याने ऑनलाइन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्याचे कार्यालयीन आदेश काढले आहेत,याचा वाईट परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होत असून ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे गोळेगाव ता परतूर येथील शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जात आहे,सदरील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पालकांच्या लक्षात आल्याने येथील शालेय व्यवस्थापन समितीने ठराव घेउन गोळेगावची शाळा ऑफलाइन पध्दतीने सुरु करावी आशी मागणी केली आहे.
याविषयी अधिक माहिती आशी की,जालना जिल्ह्यातील गोळेगाव (ता. परतूर) हे गाव जालना परभणी व बीड या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेले गोदावरी नदीच्या काठावर बसलेले एक मोठे गाव आहे, गावची लोकसंख्या जवळपास तीन हजारांच्या पुढे आहे, गावात एक ते आठ वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या 263 आशी आहे तर मुख्याध्यापका सह एकूण सात शिक्षक येथे कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वच शाळा बंद करून ऑनलाइन शिक्षण द्यावे असे आदेशही काढले आहेत,परंतु ग्रामीण भागातील अडचणी व समस्या यांची उकल शासनाने अगोदर करणे गरजेचे असताना देखील परिस्थितीचा आढावा न घेता सरळ सरळ आदेश काढून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे असे परिपत्रक काढून मोकळे झाले आहेत, ग्रामीण भागातील शेतकरी व मोलमजुरी करणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे प्रत्येक जण महागडा मोबाईल घेऊ शकत नाही आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे या गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचे टॉवर नाही म्हणून येथे मोठ्या प्रमाणावर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे येथील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि ते या शिक्षणापासून वंचित राहत आहेत, याकरिता येथील शालेय व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन प्रत्यक्ष रित्या ऑफलाईन शाळा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली असून गावात मागील एका महिन्यापासून कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही असेही ठरावात नमूद केले आहे. व शाळा सुरू केल्यास कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यात येईल असे देखील व्यवस्थापन समितीने म्हटले आहे.

कोरोनामुळे सध्या शाळा बंद शिक्षण चालू आहे यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून हे नुकसान भरून निघण्यासारखे नाही 80% विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही रेंजचा प्रॉब्लम आहे आताची परिस्थिती पाहता शासनाने व पालकांनी सहमती दिली तर आम्ही ऑफलाईन अध्यापन कार्यासाठी तयार आहोत.

(संतोष मुपडे मुख्याध्यापक गोळेगाव)

गोळेगाव येथे ऑनलाइन शिक्षण घेण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत असून व प्रत्येक पालकांकडे मोबाईल फोन नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत हे निदर्शनास आले असून पालकांच्या म्हणण्यानुसार आम्ही ठराव घेऊन शासनाकडे ऑफलाइन शिक्षण मिळावे अशी मागणी केली आहे, याचा विचार व्हावा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू.

राजेभाऊ घोरड
(अध्यक्ष शालेय व्यवस्थापण समिती गोळेगाव)

शाळा व्यस्थापन समिती, ग्राम दक्षता समिती आणि ग्राम पंचायत, गोळेगाव यांच्या पुढाकारातून शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्याची मागणी स्वागतार्ह आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांच्या सूचना व आदेश प्राप्त झाल्यास निश्चितच शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात येतील…

शेख नजर (शिक्षक)
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गोळेगाव)

विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहून मुलांच्या भविष्याची चिंता वाटत आहे, कोरोना मुळे न भरून निघणारे नुकसान झाले असून ऑनलाइन शिक्षण हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपाय नाही त्यासाठी ऑफलाईन शाळा चालू करण्यास हरकत नाही.जेणेकरून विद्यार्थ्यांची पुढील हानी टळेल .

केशव तौर
(विद्यार्थी पालक गोळेगाव)

ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून योग्य ती पावले उचलण्यात येतील.याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी यासाठी पत्रव्यवहार करून वरिष्ठांच्या आदेशानुसार योग्य निर्णय घेऊ.

एस.के.शेख(ग्रामसेवक ग्रामपंचायत गोळेगाव)

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button