बीडबीड जिल्हा

धर्मनिष्ठ स्वयंसेवकांकडून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न….!

बीड ) :-युगाब्ध 5123 विक्रम संवत 2078.. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी.. 23 जुन बुधवार अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन. याच अनुषंगाने बीड मधील देव, देश भारतमातेपोटी निष्ठा असलेल्या स्वयंसेवकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला. अठरापगड जातीतील लोकांच्या हस्ते रयतेचा राजा रयतोत्सव ह्या नात्याने महाराजांचा शिवराज्याभिषेक *हिंदु साम्राज्य दिन* म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी सकाळी 7 वाजता 7 नद्यांचे पाण्याने विविध जल मंत्रीत करून जातीधर्मातील 7 व्यक्तीच्या हातांने अभिषेक सोहळा पार पडला
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कोविड महामारीत स्मशानभूमीत अग्नीडाग देणारे व्यक्ती, अविरतपणे सेवा देणारे पोलीस कर्मचारी, परिचारिका, रुग्णवाहिका सदस्य, शहरातील स्वच्छता कामगार, सेवा देणारे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते…..

राष्ट्रसर्वप्रथम ग्रुप तर्फे कोविड योद्धांचा सत्कार डॉ. अनिल जी बारकुल , ऍड. अनिल जी तिडके , श्रीपाद जी सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला….यावेळी राष्ट्रसर्वप्रथम टीम चे सर्व सदस्य, महिला ,पत्रकार उपस्थित होते

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button