बीडबीड जिल्हा

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी नदी पात्रालगतच्या  51 गावांमध्ये कलम 144 लागू

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी नदी पात्रालगतच्या  51 गावांमध्ये कलम 144 लागू

            बीड :- बीड व शिरूर कासार तालुक्यातील सिंदफणा आणि गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रालगतच्या गावांमधून नदीपात्रातून मोठया प्रमाणात अवैध वाळू उपसा  होत असल्याने अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

            दिनांक 15 जुलै 2021 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत या गावातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि अवैध वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी  कलम 144 लागू करण्यात आले आहे. कलम 144 लागू करण्यात आल्याने या गावातील नदीपात्रातून वाहनाने प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी, बीड यांनी दिले आहेत.

          यानुसार बीड तालुक्यातील साक्षाळपिंर्पी, बहादरपूर,रंजेगाव, रामगाव, नाथापूर, तांदळवाडी(ह),आहेरचिंचोली, कुर्ला,भाटसांगवी,कुक्कडगाव, खंडूरस व आडगाव या गावात तसेच शिरूर कासार तालुक्यातील गाजीपुर, हजीपुर, कमलेश्वर धानोरा,शिरपूर गात,ब्राह्मणाथ येळंब, शिरूर कासार, दहीवंडी,कोळवाडी, नांदेवली, निमगाव मायंबा, सावरगाव राळेसांगवी या गावातील  सिंदफणा नदी पात्रातून आणि गेवराई तालुक्यातील बोरगाव बु.,गुंतेगाव, पाथरवाला बु, गुळज, सुरळेगाव, मालेगावबु, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, सावरगाव, खामगाव,आगरनांदूर, संगमजळगाव, हिंगणगाव, रेवकीदेवकी, पांगुळगाव, कटचिंचोली, भोगलगाव, राहेरी, गंगावाडी, राजापूर, काठोडा, रामपुरी, मनुबाईजवळा, गोपतपिंपळगाव, व तपोनिमगाव या गावातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतूकीवर प्रतिबंध करण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.

            कोणत्याही व्यक्तीने वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 188 अन्वये  कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे उपविभागीय दंडाधिकारी, बीड यांनी  कळविले आहे.

            सदरचा शासकीय आदेश शासकीय कर्तव्या वरील महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन तसेच सदर क्षेत्रात वाहनांना प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांने  परवानगी दिलेल्या वाहनास लागू होणार नाही.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button