बीडबीड जिल्हा

स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचा हिशोब द्या – ॲड. शेख शफिक भाऊ 

शहराला 'गटारसागर' बनविण्यात क्षीरसागर घराने जास्त जबाबदार !

बीड ) – बीड नगर परिषद कडून गेल्या पाच वर्षात शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा बाबत गांभीर्य नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. म्हणून या दोन्ही विभागाचा गेल्या पाच वर्षाचा हिशोब देण्यात यावा. असे एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
             याविषयी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की,
बीड नगरपरिषद साठी झालेल्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर ते आतापर्यंत म्हणजेच वर्ष 2016-17, 2017-18, 2018-19, 2019-20, 2020-21 या पाच वर्षांमध्ये बीड नगर परिषद स्वच्छता विभागाला शासनाकडून दरवर्षी किती निधी आला ? त्यातून किती खर्च झाला ? आलेला निधी आवश्यक असलेल्या कामांसाठी पुरला की नाही ? नाही पुरला तर शहर स्वच्छतेसाठी अजून किती निधीची आवश्यकता आहे ? या पाच वर्षांच्या काळात शहरात आवश्यक असलेली स्वच्छतेशी संबंधित  सर्व कामे पूर्णपणे करण्यात आली की नाही ? जर पूर्णपणे करण्यात आली नसेल तर अजून किती कामे बाकी आहेत ? तसेच केलेली कामे कोणकोणती ? याचा वर्ष निहाय तपशील देण्यात यावा. शहरातील नवीन विस्तारित प्रभागांमध्ये स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या कचरा कुंड्या व गाड्या हव्या त्या प्रमाणात उपलब्ध आहेत का ? नसेल तर का नाही ? शहर स्वच्छतेसाठी काही अडचणी आहेत का ? असल्यास कोणत्या ?
तसेच या पाच वर्षांमध्ये बीड नगर परिषद पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून दरवर्षी किती निधी आला ? त्यातून किती खर्च झाला ? आलेला निधी आवश्यक असलेल्या कामांसाठी पुरला की नाही ? नाही पुरला तर पाणीपुरवठ्यासाठी अजून किती निधीची आवश्यकता आहे ? या पाच वर्षांच्या काळात शहरात आवश्यक असलेली पाणीपुरवठ्याशी संबंधित पाईपलाईनची कामे पूर्णपणे करण्यात आली की नाही ? जर पूर्णपणे करण्यात आली नसेल तर अजून किती कामे बाकी आहेत ? तसेच केलेली कामे कोणकोणती ? याचा वर्ष निहाय तपशील देण्यात यावा. शहरातील नवीन विस्तारित प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या पाईप लाईन्स हव्या त्या प्रमाणात टाकण्यात आल्या का ? नसेल तर का नाही ? शहराला पाणीपुरवठा करणारे पाली धरण व माजलगाव धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असून यामधून शहराला किती दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला ? व करण्यात येत आहे ? पाणीपुरवठ्यासाठी काही अडचणी आहेत का ? असल्यास कोणत्या ? या दोन्ही प्रभागातील वरील सर्व मुद्यांचा हिशोब बीड नगर परिषद च्या मुख्याधिकार्‍यांनी द्यावा. असे एआयएमआयएम  पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हिशोब मुख्याधिकार्‍यांकडून मागितला असला तरी..!
मुख्याधिकारी यांच्याकडून हिशोब मागितला असला तरी पाणीपुरवठा आणि स्वच्छता या दोन्ही विभागाकडून शहरात आवश्यक असलेली कामे झालेली नसल्याने तसेच या दोन्ही पातळीवर वरवर बीड नगरपरिषद प्रशासन दोषी दिसत असले तरी या अवस्थेमागे नगराध्यक्ष असलेले काका, आमदार पुतणे यांच्यासह उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापतीपदी विराजमान असलेले दुसरे पुतणे हे मुख्यतः जबाबदार असल्याचा आरोपही शेख शफीक भाऊ यांनी केला असून आतापर्यंत फक्त दोनदा शहरात जोरदार पाऊस पडल्याने शहरात जे ‘गटारसागर’ वाहिले आणि तुंबले त्याला सर्वस्वी बीड नगरपरिषदेत असलेले क्षीरसागर घराणेच  जबाबदार असल्याचा आरोपही केला आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button