बीडबीड जिल्हा

पीक आले मस्त ,पण हरणं करू लागले फस्त

बीड ,कांही ठिकाणी चांगला पेरणी योग्य पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि कापूस तूर सोयाबीन मूग उडीद,अशी पिके अतिशय चांगली अली परंतु बीड तालुक्यातील गुंधा शिवार,पिंपळनेर, ताडसोन्ना,वडगाव,लिंबारुई,पोखरी,केसापुरी या भागात देखील हरणाचा उपद्रव वाढला असून हा कळप पूर्णपणे पिकच फस्त करू लागल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत, याकडे संबंधित वनविभागाने गांभीर्याने लक्ष घालून या हरणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शेतकऱ्यांना नेहमीच अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे हे काही नवीन नाही ,कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त होतो ,सतत पडणाऱ्या दुष्काळाने शेतकरी होरपळून निघत असल्याने आत्महत्या सारखा टोकाचा पाऊल उचलण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येत आहे ,शेतकऱ्यांना ना राजकारण्याकडे न्याय मिळतो, ना शासनदरबारी न्याय मिळतो ,आयुष्यभर शेतकऱ्यांना संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही असेच म्हणावे लागेल, मोठ्या प्रमाणात हरणांच्या उपद्रवाला शेतकरी वैतागला असून सकाळी पहाटे पासून रात्री आठ वाजेपर्यंत हरणांच्या कळपाला हुसकून लावण्यासाठी शेतकरी तटस्थपणे शेतात रहावे लागत असल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे बीड तालुक्यातील गुंधा शिवार,पिंपळनेर, ताडसोन्ना,वडगाव,पोखरी, लिंबारुई ,या भागात मोठ्याप्रमाणात वावर करत असल्याने पिकांची पुरती वाट लागली आहे ,या कडे वनविभागाने लक्ष घालणे गरजेचे असून तात्काळ याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button