ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासाठी उद्या आ. सुरेश धस यांचा मोर्चा

मराठा आरक्षण , पिक कर्ज , ऊसतोड मजुरांचे प्रश्न , आरोग्य कंत्राटी कर्मचारी यासह इतर प्रश्नांसाठी  उद्या(दि.२८) मध्ये मोर्चा

  • मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भाजपचे बीड, लातूर उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा, कोरोनातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, ऊसतोड कामगारांसाठी कायदा बनवावा या मुद्यांकडेही मोर्चातून लक्ष वेधले जाणार आहे.

बीड : मराठा आरक्षणासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत असताना आता परत बीड मध्ये सुद्धा मराठा आरक्षणासाठी आमदार सुरेश धस यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोर्चा. मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांना तातडीने पिक कर्ज देण्यात यावेत , पिक विम्याच्या पॅटर्न उलटा चाललाय , यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी , ऊसतोड मजुर , मुकादम यांच्यासाठी कायदा करावा , 66 % भाववाढ देण्यात याव , कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना पात्र करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय
याठिकाणी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी दिली .

मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा लोकशाही मार्गाने लढा देत आहेत . परंतु आज पर्यंत मराठा समाजाला यश आलेले नाही . यामुळे मराठा समाजातील युवकांचे यात मोठे नुकसान होत आहे . यासह इतरही समस्यांचा सामना मराठा समाजाला करावा लागत आहे . यासह जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहे . तसेच सध्या शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत . त्यांच्या अडचणी दुर करुन त्यांना तात्काळ पिक कर्ज देण्यात यावे , ज्यांनी कोरोनाच्या काळात आपला जिव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केल्या त्या आरोग्य कंत्राटी कर्मचायांना शासकिय सेवेत घेण्यात यावे , पिक विमा बीड पॅटर्न उलटा चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button