गेवराईबीड जिल्हा

अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करणार—सुरेश आप्पा आहेर

बोरी पिंपळगावचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

गेवराई ) जनतेच्या सुखदुःखात धाऊन येणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे गेवराई तालुक्याचे लोकप्रिय नेते अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करुन राष्ट्रवादीचा विचार जनसामान्या पर्यंत घेऊन जाणार असल्याची प्रतिक्रिया बोरी पिंपळगाव येथील कार्यकर्ते सुरेश आप्पा आहेर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असताना ते बोलत होते.

गेवराई तालुक्यातील मौजे बोरी पिंपळगाव येथील भाजप-शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते सुरेश आप्पा आहेर, पांडुरंग वडघणे, विठ्ठल धोत्रे, गणेश अशोक वडघणे आदींनी भाजप-सेनेचा त्याग करून माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले.

या प्रसंगी गणेश वडघणे, भास्कर महाराज मोटे, परशुराम पवार, विठ्ठल वडघणे, नारायण वडघणे, अझहर ईनामदार, रफिक सौदागर, जावेदभाई पठाण यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button