बीडबीड जिल्हा

आधुनिक महाराष्ट्र घडविण्याच्या जडणघडणीत वसंतरावजी नाईक यांचा सिंहाचा वाटा- डाॅ. योगेश क्षीरसागर

बीड, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारे हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाचे भूषण वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना व कृषी दिनानिमित्त वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना वरील विचार डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले

महाराष्ट्र घडविण्यासाठी ज्या महापुरुषांनी प्रयत्न केले त्यामध्ये वसंतरावजी नाईक यांचा वाटा सिंहाचा असून महाराष्ट्र आणि संपुर्ण भारत देशा मध्ये कृषी क्रांती ,अनेक मोठमोठे जलसिंचन प्रकल्प ,ऊर्जा प्रकल्प, कृषी विद्यापीठे, कापूस एकाधिकार योजना त्याच बरोबर प्रशासनाचा कारभार व्यवस्थित व्हावा यासाठी भारत देशामध्ये पंचायतराज व्यवस्था निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांना जाते परदेशातून कृषीविषयक शिक्षण घेऊन आपल्या देशामध्ये यशस्वीरीत्या प्रयोग करून वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनविण्याचे कार्य वसंतराव नाईक यांनी केले महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांना हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेसारखी महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण झाली हि योजना नंतर संपूर्ण भारत देशामध्ये लागू करण्यात आली अशा या महान नेत्यास मी विनम्र अभिवादन करतो व तमाम बंजारा बांधवांना जयंतीनिमित्त व कृषी दिनानिमित्त शुभेच्छा देतो तसेच माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या माध्यमातून लवकरच बंजारा समाजासाठी बंजारा भवन साठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल व पुतळ्याजवळ सुशोभीकरण करण्यात येईल असेही म्हणाले,या कार्यक्रमास नगरसेवक गणेश तांदळे,व पोपळे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण सभापती बाबुरावजी जाधव, बंजारा समाजाचे नेते अंकुश राठोड, भूषण पवार वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, सचिव अर्जुन चव्हाण ,तसेच सरपंच विष्णू पवार ,प्रा. जगन्नाथ चव्हाण प्रा. राजेश राठोड ,प्रकाश आडे ,बबलू राठोड ,प्रकाश पवार, श्रीराम राठोड ,श्रीमंत राठोड, विठ्ठल राठोड, वसंत राठोड, संजय पवार व तमाम बंजारा बांधव उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button