केजबीड जिल्हा

मराठवाड्यातील मराठा समाज सरकारच्या चुकीमुळे आरक्षणापासून वंचित — शिवाजी ठोंबरे

केज ,सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. ठिकठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन, मोर्चे निघत आहेत.मराठा आरक्षणासाठी स्वतः खासदार संभाजी राजे मैदानात उतरले असून सध्या त्यांचा जनसंवाद दौरा सुरू आहे. त्यानिमित्ताने ते नुकतेच बीड दौऱ्यावर आले असता. छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव ठोंबरे यांनी छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.किशोर (भाऊ) चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खासदार. मा.संभाजी राजे यांची भेट घेऊन मराठवाड्यातील मराठा आरक्षणावर चर्चा केली.खा.काकासाहेब कालेककर आयोग यांनी १९५५ मध्ये हैद्राबाद स्टेट मधील मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये केला होता.त्याच धर्तीवर आज मराठा समाज आंध्ररप्रदेशात ओबीसी मध्ये आहे.नागपूर करार करून मराठवाड्यासह विदर्भ हा महाराष्ट्रात सामील झाला. त्यामुळे१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य झाले.घटनेच्या ३७१ उपकलम द्वारे एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात समाविष्ट झालेल्या भागास घटनात्मक संरक्षण दिलेले आहे.महाराष्ट्र सरकारने १९६७ मध्ये ओबीसी १८० जातींची यादी जाहीर केली.त्यामध्ये १८१ क्रमांकावर मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करणे गरजेचे होते.समावेश न करता हा अन्याय महाराष्ट्र सरकारने मराठा समाजावर केलेला आहे.या बाबींकडे लक्ष देऊन मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा मागणीचे निवेदन देऊन विनंती करण्यात आली.यासंदर्भात छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण यांनी उच्चन्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. अशी माहिती यावेळी खासदार संभाजी राजे यांना देण्यात आली. सदरील महितीचे निवेदन देताना शिवाजी (दादा)ठोंबरे संपादक गंगाधर नाना काळकुटे , पत्रकार श्रिकांत जाधव , विकास पाटोळे आदी कार्यकर्ते ऊपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button