गेवराईबीड जिल्हा

‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्यांनी जनतेची घोर निराशा केली

विजयसिंह पंडित यांचे केंद्रातील भाजपा सरकारवर टिकास्त्र

गेवराई, ) ः- कोरोना संक्रमणामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या जनतेला महागाई आणि इंधन दरवाढीचा झटका देत अच्छे दिन चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्यांनी सामान्य जनतेची घोर निराशा केली, केंद्रातील भाजपा सरकारवर विजयसिंह पंडित यांनी टिकास्त्र सोडले. केंद्रातील भाजपा सरकारने घरगुती वापराचा गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किंमतीमध्ये केलेली विक्रमी दरवाढ आणि देशभरात वाढलेली महागाई याचा निषेध नोंदविण्यासाठी विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुका राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीच्यावतीने तहसिल कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

देशभरात वाढलेली महागाई, उच्चांकी इंधन दरवाढ याचा निषेध करण्यासाठी गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तहसिल कार्यालयासमोर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विजयसिंह पंडित यांनी महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध नोंदविताना भाजपा सरकारवर तिव्र टीका केली. ते म्हणाले, कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकट काळात सुध्दा महाराष्ट्राला भाजपा सरकारने मदत करताना जाणीवपूर्वक दुजाभाव करून अन्याय केला, कोरोनाच्या संक्रमण काळात शेतकरी, शेतमजुर यांच्यासह सर्वसामान्य नागरीकांना मोठी आर्थिक झळ बसली, बेरोजगारी वाढली असे असताना जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारने महागाई आणि इंधन दरवाढ करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. घरगुती वापराचा गॅस आणि जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्यामुळे गृहीणीचे अर्थकारण बिघडले आहे. महिलांसह सामान्य जनतेमध्ये शासन विरोधी तिव्र असंतोषाची भावना निर्माण झाली असल्याचेही विजयसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात सांगितले. केंद्र सरकारने महागाई कमी करणे संदर्भात ठोस भुमिका न घेतल्यास भविष्यात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. तहसिलदार सचिन खाडे यांना यावेळी लेखी निवेदन देण्यात आले.

इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी दुचाकीची मिरवणुक गेवराई शहरातून काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा सरकार विरोधी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगनपाटील काळे, संग्राम आहेर, फुलचंद बोरकर, शाम मुळे, राधेशाम येवले, ऋषिकेश बेदरे, सुभाष मस्के, अक्षय पवार, भाऊसाहेब माखले, शेख सलीम, बाळासाहेब दाभाडे, किशोर पारख, श्रीराम आरगडे, दिनेश घोडके, विलास निकम वसीम फारुकी, दत्ता दाभाडे, संदीप मडके, कल्याण चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कोविड संदर्भातील सर्व नियमांची पालन यावेळी करण्यात आले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button