गेवराईबीड जिल्हा

गेवराई पंचायत समितीची मासिक सभा झुम ॲपद्वारे संपन्न

गटनेते परमेश्वर खरात यांनी विविध प्रश्नी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

गेवराई :  गेवराई पंचायत समितीच्या मासिक सभेचे झुम ॲपद्वारे आयोजन करण्यात आले होते.या सभेत पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादीचे गटनेते परमेश्वर खरात यांनी विविध प्रश्नावर आक्रमकपणे आपली भुमिका मांडत पंचायत समितीच्या कारभाराचे वाभाडे काढले. आयोजित बैठकीत गटनेते परमेश्वर खरात हे आक्रमण होवून त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भाबेरी उडाली.
गेवराई पंचायत समिती मासिक सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झुम ॲपद्वारे नुकतीच संपन्न झाली. गटनेते परमेश्वर खरात यांनी झुम ॲपद्वारे झालेल्या बैठकीत बोलताना म्हटले की गेवराई तालुक्यात घरकुल योजनेत लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर होवून एक दोन वर्ष उलटून ही त्यांना फक्त एकच हप्ता देण्यात आला आहे. त्या लाभार्थ्यांनी व्याजाने पैसे काढून घरांचे बांधकाम पुर्ण केले आहे परंतु त्यांना हप्ता न मिळाल्याने त्या लाभार्थ्यांची अडवणूक होत आहे असा आरोप केला. या संदर्भात घरकुल विभागाचे अधिकारी यांना प्रश्न केला असता बैठकीत त्यांना सविस्तर माहिती देता आली नाही. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत सुरु असलेली कामे आणि नरेगा योजनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. मनरेगा मधील शेतकऱ्यांच्या शेततळे कामाची मागणी देवूनही मस्टर निघत नाहीत. शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते आहे. तसेच गेवराई बंगाली पिंपळा रोडवरील वडगाव चिखली येथील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. आत्तापर्यंत गुत्तेदाराने पुलाचे काम पुर्ण केले नाही. तयार केलेला साइड पुल दोन वेळेस वाहुन गेला त्यामुळे 15 ते 16 गावांचा संपर्क तुटला होता त्या रखडलेल्या कामामुळे त्या नागरिकांचे हाल होत आहेत. तरी त्या पुलाच्या बांधकामाचा प्रश्न तात्काळ संबंधित गुत्तेदारास सुचना देवून पुर्ण करा असे अभियंता मोरे यांना सुचवले आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी हे पंचायत समिती मासिक सभेस हजर राहून अद्याप पर्यंत कृषी विभागाचा आढावा देत नाहीत व कृषी विभागाच्या योजनांची माहितीही देत नाहीत. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कदम हे पंचायत समिती सभागृहात कोरोना काळातील कसलीही माहिती अद्याप पर्यंत दिलेली नाही तसेच ते बैठकीस हजर ही राहत नाही याबाबत पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात यांनी आक्रमक भूमिका मांडत
समाधानकारक उत्तर न मिळाल्याने झुम ॲप द्वारे झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले. बैठकीत गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप सह आदि अधिकारी व सदस्य सहभागी होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button