जालना

आष्टी बसस्थानक परिसर व्यापला बांधकाम साहित्याने वाहतूक कोंडी वाढली ; नागरिक त्रस्त

आष्टी प्रतिनिधी :- आष्टी ता.परतूर येथील बसस्थानकात बांधकाम साहित्य टाकल्याने वाहतुक कोंडी वाढल्याने नागरिकांसह वाहन धारक त्रस्त झाले असुन या कडे लक्ष देण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की आष्टी ता.परतूर येथील बसस्थानकात गेल्या अनेक महिन्यापासुन बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आले असुन या मुळे आष्टी बसस्थानकात बस उभी करणे वाहकांना मोठी डोके दुखी ठरत असुन बसस्थानक परिसर मोठा असुनही या ठिकाणी येणाऱ्या बसेस रस्त्यावर उभी करण्याची वेळ वाहकावर आल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत असून या मुळे नियमीत पणे वाहतुकीची कोंडी होत आहे पुराबाजार रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्या पासुन कासव गतीने सुरु असुन त्याचे साहित्य मात्र मोठ्या प्रमाणवर बसस्थानकात पडुन असल्याने वाहन धारक त्रस्त तर झालेच सोबतच अल्पशा पावसात गावाच्या अंतर्गत मुख्य रस्त्याला डबक्याचे स्वरूप येत असल्याने होणारे काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरीकातून होत आहे. बसस्थानकात पडलेल्या बांधकाम साहित्य हलविल्यास वाहतुक कोंडी सुटण्यात मदत होईल मात्र या बाबी कडे आगार प्रमुख यांचे देखील दुर्लक्ष होत असल्याने त्याचा मनस्ताप वाहकांना करावा लागत आहे हे मात्र खरे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button