गेवराईबीड जिल्हा

सहाराच्या मदतीला धावला कुटे ग्रुप

बीड )ः कोरोनाच्या काळात सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक उपक्रम राबविणार्‍या घटकांनाही अडचणी येत आहेत. गेवराई तालुक्यातील सहारा बालग्रामसमोर देखील अडचणी असल्याचे कळल्यानंतर बीडच्या कुटे ग्रुपने अनाथालयाला तेल आणि धान्य पुरविले आहे.
गेवराई तालुक्यातील सहारा बालग्राम या अनाथालयाला सध्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत शंभरहून अधिक बालकांना सांभाळताना प्रकल्प संचालक संतोष गर्जे यांची अडचण होत असल्याचे समजल्यानंतर तिरूमला ग्रुपच्या अर्चना कुटे, आर्यन कुटे आणि कुटे ग्रुपच्या वतीने या ठिकाणी धान्य  आणि तेल पाठविण्यात आले. कुटे ग्रुपच्या वतीने राजकुमार आपेट, रवी तलबे व शिंदे यांनी सदरची मदत सहाराचे संतोष गर्जे यांच्याकडे सोपविली.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button