केजबीड जिल्हा

मौजे जोला शिवारात काळवीटाला कुत्र्याच्या तावडीतून जिवदान

केज  :- केज तालुक्यातील मौजे जोला शिवारात काळवीटाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून घेत जिवदान देण्याचा प्रयत्न अविनाश ढाकणे , बापुराव ढाकणे, अशोक ढाकणे यांनी केल्यामुळे काळवीट सुखरुप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

आज शुक्रवार दिनांक 09 जुलै 2021रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान बुरजेशेत नावाच्या शेतामध्ये एका काळविटाला सात आठ कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले हे बापुराव ढाकणे व अशोक ढाकणे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ काळविटाच्या दिशेने धावत जाऊन कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. व काळविटाचे प्राण वाचवला. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवर दिली. या संपूर्ण प्रकरणात, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांपासुन ते मंडळ स्तरिय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच प्रयत्न करत काळवीट पुढील उपचारासाठी धारुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात घेऊन जाण्यासाठी मोलाचं योगदान दिले.
या सर्व प्रक्रियेत लेक लाडकी अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे यांनी प्रयत्न करत काळवीट वन विभागाच्या स्वाधीन करण्यास सहकार्य केले. असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रक्रियेत बीड चे जिल्हा वनसंरक्षण अधिकारी तेलंग साहेब , धारुर वनपरिक्षेत्र अधिकारी वरवडे साहेब, सारिका मोराळे , चव्हाण व वनविभागाचे वाहनचालक यांनी प्रयत्न करत आज एका काळवीटाचे प्राण वाचवले.

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्मिळ प्राणी व पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
जंगली पक्षी व प्राणी पाण्याच्या व अन्नाच्या शोधात मानवी वस्ती जवळ येत आहेत. या मुळे कुत्रे या प्राण्यांची शिकार करत आहेत. नागरिकांनी प्राणी व पक्षी यांना कुत्र्याच्या व हिंस्र प्राण्यांच्या तावडीतून सोडविले पाहिजे.
श्री बाजीराव ढाकणे
बीड जिल्हा समन्वयक लेक लाडकी अभियान

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button