बीडबीड जिल्हा

पाली येथे गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत अँड. अजित देशमुख यांची शिवारफेरी – तरुण शेतकऱ्यांचे केले अभिनंदन

बीड तालुक्यातील पाली येथे छोट्या प्रयत्नाने गट शेतीचा प्रयोग राबविणाऱ्यां चार तरुण शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पारंपरिक शेतीची पद्धत सोडून अशा प्रकारे शेती करणे शेतकऱ्यांना परवडणारे आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आपण अभिनंदन करतो, असे यावेळी शिवार फेरी नंतर अँड. देशमुख यांनी म्हटले.

कै. अँड. सूर्यभान गोरे यांची दोन मुले रणजीत आणि नटराज यांचेसह अन्य तीन शेतकरी विलास नवले, बाबासाहेब नवले व अशोक नवले हे एकत्र आले. त्यांनी या प्रयोगाला छोटेखानी सुरुवात केली आहे. यात त्यांना चांगल्या प्रकारचे यश देखील संपादन झाले आहे. पिकांमध्ये केलेली मेहनत पिके चांगले आणण्यासाठी कारणीभूत ठरली असल्याचे अँड. देशमुख यांनी मारलेल्या शिवार फेरी मध्ये स्पष्ट दिसत होते.

या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मल्चिंग करून ढोबळी मिरची, कोबी वगैरे पिकांची लागवड केली आहे. ही सर्व पिके शेतकरी ठिबक सिंचन द्वारे पाणी उपलब्ध करून घेत आहेत. त्यामुळे पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात बचत होण्यास आणि आवश्यक तेवढे पिकाला पाणी देणे आणि आवश्यक त्या खतांची मात्रा देणे. या ठिबक सिंचन मुळे शक्य झाले आहे.

अँड. गोरे हे शेती प्रिय शेतकरी होते. शेतकऱ्यांना अनेकविध बाबीचे ज्ञान देण्याचा त्यांचा अखंड प्रयत्न असायचा. त्यामुळे त्यांची मुले आणि शेतकरी एकत्र आल्याने आपल्याला या बाबीचा विशेष अभिमान वाटतो, असेही देशमुख यांनी यावेळी म्हटले. या सर्व शेतकऱ्यांबरोबर शिवार फेरी मारून देशमुख यांनी सर्व मुद्दे समजून घेत या शेतकऱ्यांनाही योग्य ते मार्गदर्शन केले.

यापैकी नटराज गोरे याने बी.एस्सी. (ऍग्री) हे पदवी संपादन केली आहे. त्यामुळे या शेतीला, पिकाला, मेहनतीला मूर्त रूप देणे या सर्वांना सोपे जाते. संपादन केलेले ज्ञान अशा प्रकारे वापरले गेले, मेहनतीची तयारी ठेवली, तर असे उपक्रम आणि शेती मोठ्या फायद्याची ठरू शकते. या शेतकऱ्यांचा हा दुसरा प्रयत्न आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उभारणीच्या खर्चातून हे आता बाहेर पडताना दिसतात.

पारंपारिक पद्धतीने तीच ती पिके घेऊन शेतीचा पोत देखील कमी होत आहे. त्याच प्रमाणे ज्यावेळेस तीच ती पिके बाजारपेठेत घेऊन शेतकरी जातो, त्यावेळेस व्यापाऱ्यांकडून ही त्याची पिळवणूक होत असते. बाजारभाव ढासळलेला असतो. शेतकऱ्यांचे पीक निघाले, ते बाजारात गेले की, शासन देखील व्यापाऱ्यांची बाजू घेत शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला मोठ्या प्रमाणात समर्थन देत असल्याचे बऱ्याच वेळा दिसून येते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी पिके घेतली तर ज्या बाजारपेठेत भाव मिळेल, अशा ठिकाणी ही पिके नेता येतात. शेतकऱ्यांना ते परवडते. त्यामुळे गट शेतीच्या या प्रयोगाबद्दल शेतकरी अभिनंदनास पात्र असल्याचे देशमुख यांनी म्हटले. यावेळी अँड. लिंबराज लाखे, नटराज गोरे, विलास नवले, बाबासाहेब नवले, अशोक नवले यांचे सह रणजित गोरे, अशोकराव नवले, वैगुंडे व अन्य शेतकरी हजर होते

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button